पवित्र रमजान महिन्यात कारागृहातील कैद्यांना विशेष सवलती द्या- भाई अमन

पवित्र रमजान महिन्यात कारागृहातील कैद्यांना विशेष सवलती द्या- भाई अमन

यवतमाळ- ३ एप्रिल पासून मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना सुरू होत आहे. या महिन्यात मुस्लिम समाज बांधव संपूर्ण महिनाभर नमाज रोजा व पवित्र कुराण चे पठण करीत असतात. अल्लाहची ईबादत करतात, अशा पवित्र रमजान महिन्यात राज्यातील सर्वच कारागृहामध्ये बंदिस्त असलेल्या मुस्लिम कैद्यांना अल्लाहची ईबादत करण्याकरीता विशेष सवलत उपलब्ध करावी, अशी मागणी यवतमाळ येथील जेष्ठ समाजसेवक भाई अमन यांनी केली आहे. कारागृहातील बंदीस्त मुस्लीम बांधवाना अशा प्रकारे विशेष सवलत देणे हे मानवतावादी दृष्टिकोनातून आवश्यक असल्याचे मतही भाई अमन यांनी व्यक्त केले आहे. या रमजान महिन्यात मुस्लीम कैद्यांना विशेष सवलती उपलब्ध करून देण्याची मागणी भाई अमन यांनी केली आहे. ३ एप्रिल २०२२ पासून मुस्लीम धर्मीयांचे पवित्र रमजान मासची सुरवात होत आहे. सदर महिन्यामध्ये सर्व मुस्लीम धर्माचे नागरीक (महिला / पुरुष) रोजा (उपवास) ठेऊन अल्लाह ची प्रार्थना करतात आणि यामध्ये राज्यातील कारागृहामध्ये असलेले विचाराधीन व शिक्षा भोगत असलेले कैदी सुध्दा याचे पूर्णपणे पालन करुन रोजा (उपवास) ठेऊन अल्लाह ची विशेष नमाज (प्रार्थना ) पठन करतात. यास्तव राज्यातील कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांना येत्या रमजानच्या पूर्ण महिन्यामध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून कारागृह प्रशासना कडून सकाळी सहेरी पासून संध्याकाळी रोजा (उपवास) अफ्तारी पर्यंत आणि रात्री तराबीह च्या विशेष नमाज पठनासाठी मानवतावादी दृष्टीकोनातूनआवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी जेष्ठ समाजसेवक भाई अमन यांनी केली आहे.

Updated : 2 April 2022 12:36 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.