परराज्यातून कामाला आलेल्या कामगारांची 70 हजार रुपयांचीने केली फसवणुक

परराज्यातून कामाला आलेल्या कामगारांची 70 हजार रुपयांचीने केली फसवणुक

यवतमाळ दि.26 फेब्रुवारी : परराज्यातून यवतमाळ जिल्ह्यात रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या कामगारांची रक्कम व एटीएम चोरून नेले व एटीएम मधून 70 हजार रुपये काढले या गंभीर प्रकरणाची अवधूत वाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करूनही चोरट्यांचा तपास व कारवाई केल्या जात नसल्यामुळे अखेर त्या कामगाराने आपल्यासोबत घडत असलेल्या प्रकाराची माहिती देण्याकरिता आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

दि. 19 फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते दोन च्या दरम्यान संतोषकुमार सालवंशी यांनी चिंतामणी ट्रॅव्हल्स जवळ एसबीआय एटीएम मध्ये जाऊन 19000 काढले व यावेळी मागे असलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने त्यांना सांगितले कि दवाखान्याच्या कामाकरिता एक लाख 50 हजार रुपये पाठवायचे आहे.मात्र एटीएम मधून पैसे टाकता येत नाही असे सांगून त्यांच्याजवळील रक्कम मोजण्यासाठी दिली व संतोषकुमार सालवंशी यांनी काढलेले 19 हजार रुपये व एटीएम कडील कापडी पिशवी ठेवली नजर चुकून त्या दोन चोरट्यांनी पिशवी हिसकावून पळ काढला.हा प्रकार घडल्यानंतर अवधूत वाडी पोलीस स्टेशन मध्ये संबंधितांनी धाव घेतली.मात्र तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता बँकेचे किंवा एटीएमचे मिनी स्टेटमेंट सोमवारी घेऊन या असे सांगितले तसेच एटीएम चोरी गेल्याने व दोन दिवस बँक बंद असल्याने खाते बंद करता आले नाही,त्यामुळे पुन्हा रात्री पोलीस स्टेशनमध्ये गेले असता त्यांनी साध्या कागदावर सही घेऊन परत केले.रविवारी सकाळी माझ्या बँक खात्यातून पैसे काढल्याचे आणखी एक मेसेज आला.त्यावेळी तो घाबरून सायबर सेलचे कार्यालय गाठले त्यावेळी शिपाई यांना भेटून माझ्या खात्यातील 70 हजार रुपये गेल्याचे सांगितले.त्यानंतर संतोषकुमार सालवंशी हे पुन्हा पाच वाजता अवधूतवाडी पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी उपस्थित असलेले एकूण दिकुंडवार यांना भेटले असता त्यांच्या सूचनेनंतर याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध भादंवि कलम 379,34 नुसार गुन्हा आला.

मात्र अवधूत वाडी पोलीस घडलेल्या प्रकरणात दिरंगाई करत असल्याचा आरोप आज शासकीय विश्रामगृह मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संतोष कुमार यांनी केला. गुन्हा दाखल केल्यानंतर ही घटनास्थळाचा पंचनामा सुद्धा करण्यात आला नाही व दिलेल्या तक्रारीवरून त्वरित दखल घेतली असती तर त्या चोरट्यांना त्या एटीएम मध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून पकडणे सोपे झाले असते घटनेच्या दिवशी जर या तक्रारीची दखल घेतली गेली असती तर त्यांचे परत 60 हजार रुपयांने फसवणूक बँकेतून काढून घेण्यात आले नसते यामुळे माझे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. यासंदर्भात दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक यांना सुद्धा याबाबत निवेदन दिले असून यात पोलिस प्रशासनाने संबंधित चोरट्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी केली व व माझ्या सोबत घडलेला प्रकार इतर कोणासोबत हे घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने त्वरित गंभीर या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी करिता पत्रकार परिषदेतून मागणी करित आहे.

साळीचे लग्न असल्याने त्यांनी सोसायटीचे कर्ज उचलले असुन काही दिवसांवर साळीचे लग्न आल्याचे संतोषकुमार सालवंशी यांनी सांगितले,मात्र लग्नासाठी उचललेली रक्कम चोरीला गेल्याने संतोषकुमार अत्यंत चिंतेत असल्याने मानसिक संतुलन बिघडल्याचे ही त्यांनी सांगितले.

चोरून नेलेल्या एटीएमद्वारे चोरट्यांनी केली ऑनलाइन शॉपिंग

चोरट्यांनी एटीएम चोरून नेल्यानंतर एटीएम द्वारे दोन वेळा 15 हजार -15 हजार रुपयारुपयांची इन शॉपिंग केली. तसेच वीस हजार रुपये 321495878553 या बँक खात्यात वळते केले.त्या नंतर शनी मंदिर चौकातील दक्षता पेट्रोल पंप मध्ये असलेल्या एटीएम मधून साडेसात हजार रुपये काढल्याचे ही बँक स्टेटमेंट वरून स्पष्ट दिसत आहे.मात्र याबाबत अवधूत वाडी पोलिसांनी ज्या ठिकाणी ऑनलाइन शॉपिंग केली ज्या एटीएम मधून पैसे विड्रॉल केले त्याचे सीसीटीव्ही कॅमेरे लावुन आहे.ते सीसीटीव्ही फुटेज तपासणे गरजेचे असताना आजपर्यंत पोलिसांनी याबाबत कुठलीही कारवाई केली नाही.विशेष म्हणजे ते दोन्ही चोरटे विना मास्क असल्याने ते कोण आहे हे ओळखण्यास नक्कीच मदत होईल.मात्र पोलिसांची इच्छाशक्ती या गुन्ह्यांमध्ये तपास करण्याची दिसत नाही असा आरोपही यावेळी संतोष कुमार यांनी केला.

Updated : 28 Feb 2022 7:24 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.