पद्मभूषण स्वीकारण्यास भट्टाचार्य यांचा नकार

पद्मभूषण स्वीकारण्यास भट्टाचार्य यांचा नकार

कोलकता – पश्‍चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना मंगळवारी पद्मभूषण सन्मान जाहीर करण्यात आला. मात्र, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) ज्येष्ठ नेते असणाऱ्या भट्टाचार्य यांनी तो सन्मान स्वीकारण्यास नकार दर्शवला.

त्या सन्मानाबाबत मला काहीच माहीत नाही. त्याविषयी कुणीच मला काही सांगितले नाही. मला तो सन्मान दिला जाणार असेल; तर तो मी नाकारतो, अशा आशयाचे निवेदन भट्टाचार्य यांनी जारी केले. त्यांनी तातडीने कुठली तपशीलवार भूमिका मांडली नाही. मात्र, पद्मभूषण नाकारण्याचा निर्णय भट्टाचार्य आणि पक्षाने संयुक्तपणे घेतल्याची माहिती माकपच्या सुत्रांनी दिली.

भट्टाचार्य यांच्याबरोबरच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनाही पद्मभूषण जाहीर झाला. ते दोन्ही नेते केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या विचारसरणीशी असहमती दर्शवणाऱ्या पक्षांचे प्रतिनिधित्व करतात. दरम्यान, भट्टाचार्य यांच्या नकारानंतर सरकारी सुत्रांकडून स्पष्टीकरण देण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी सकाळी भट्टाचार्य यांच्या घरी फोन केला. भट्टाचार्य आजारी असल्याने त्यांच्या पत्नीने फोन घेतला.

अधिकाऱ्याने भट्टाचार्य यांना पद्मभूषणने सन्मानित केले जाणार असल्याचे सांगितले. ती माहिती भट्टाचार्य यांना देते, असे त्यांच्या पत्नी म्हणाल्या. त्यानंतर भट्टाचार्य सन्मान स्वीकारणार नसल्याची माहिती त्यांच्या कुटूंबातील कुणीच केंद्रीय गृह मंत्रालयाला दिली नाही. पद्म सन्मानाची माहिती आधीच संबंधितांना दिली जाते. त्यांचा आक्षेप नसेल तरच त्यांच्या नावांची घोषणा केली जाते, असे त्या सुत्रांनी नमूद केले.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.