पंचवटी ते नवसारी राजपूत धाबा पर्यंतच्या फोरलेन कामाची आ. सुलभाताई खोडके यांनी केली पाहणी

दर्जेदार व गुणवत्तापूर्वक कामांप्रती सुलभाताईंनी व्यक्त केले समाधान
अमरावती २७ जानेवारी : रस्ता निर्मितीची कामे करीत असतांना संबंधित अधिकारी व कंत्राटदारांनी सुद्धा आपली सामाजिक बांधीलकी जोपासून विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक होईल , ही भावना बाळगीत गतीमान विकासाच्या मालिकेत आपलेही योगदान देण्याचे आवाहन आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना केले होते. त्या अनुषंगाने अमरावती कॅम्प शॉर्ट रस्ता पंचवटी चौक ते नवसारी राजपूत धाबा पर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण उच्च दर्जात्मकरित्या व स्थापत्य क्षेत्रातील प्रगत तंत्रातून युद्धपातळीवर सुरु असून अनेक कामे प्रगतीपथावर आली आहे. आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी गुरुवार दिनांक २७ जानेवारी २०२२ रोजी प्रत्यक्ष रस्ता बांधकाम स्थळी भेट व पाहणी करीत प्रगतीपथावरील कामाप्रती समाधान व्यक्त केले .
अमरावती कॅम्प शॉर्ट रस्ता हा राज्य मार्ग २९९ चा भाग असून शहरातील मध्यवर्ती पंचवटी चौक येथून सुरु होऊन तो पुढे नवसारी राजपूत धाबा पासून अनेक तालुक्यांना जोडलेला आहे. या रस्त्यावरील पंचवटी चौक ते नवसारी राजपूत धाबा पर्यंतच्या मार्गावरून नेहमीच प्रवाशी वाहतूक , माल वाहतूक , जड वाहतूक , शाळा -महाविद्यालयीन वाहतूक दिसून येते . या मार्गावर अनेक लोकवसाहती , व्यापारी संकुले , असल्याने स्थानिक नागरिकांना अवागमनासाठी याच मुख्य मार्गाचा अवलंब करावा लागतो . वाढत्या शहरीकरणाच्या काळात या मार्गावरून होणारी रहदारी लक्षात घेता ,अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ६१ कोटी रुपयांच्या निधी शासनाकडून मंजूर करून आणला आहे. इतकेच नाही तर प्रशासकीय मान्यता ही मिळवून दिल्याने तदनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ई – निविदाही पूर्ण केली . दरम्यान कोरोना पार्श्वभूमीवर कुठलाही भूमिपूजन सोहळा घेण्याचे टाळून आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सदर कामाला थेट सुरुवात करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना केली असता , आता पंचवटी ते नवसारी राजपूत धाबा पर्यंतच्या रस्ता चौपदरीकरणाच्या काँक्रीटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सदरचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्वक रित्या होत असून काँक्रीट रस्ता , काँक्रीट गटर्स , फुटपाथ व इतर कामे देखील प्रगतीपथावर आली आहेत . आपल्या पाहणी दरम्यान आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी रस्ता चौपदरीकरणाच्या इत्यंभूत बाबींचा आढावा घेतला .
सद्या स्थित राजपूत धाबा ते कठोरा नाका पर्यंत उजवा भागाचे १०. ५० मीटर रुंदीचे रस्ता काँट्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याचे अभियंत्यांनी यावेळी सांगितले. तसेच कठोरा नाका ते शेंगाव नाका चौक इथपर्यंत रस्त्याचे मिलिंग चे काम पूर्ण झाले असल्याचे सुद्धा अभियंत्यांच्या वतीने सांगण्यात आले . यावर यावेळी आमदार महोदयांनी रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाप्रती समाधान व्यक्त करीत सदर कामे उत्कृष्ट रित्या व गतीने प्रगतीपथावर आणल्या बद्दल सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता व कंत्राटदारांचे अभिनंदन केले . सदर रस्ता हा अत्यंत वर्दळीचा असल्याने या रस्त्यावर सुरक्षित प्रवास व अपघात विरहित वाहतुकीची सोय व्हावी व नागरिकांना चांगली सुविधा मिळावी म्हणून राजपूत धाबा ते कठोरा नाका पर्यंत उजवा भागाचा पूर्णत्वास आलेला रस्ता अवागमनासाठी खुला करावा , अशी सूचना आमदार महोदयांनी केली. तसेच लगेच डाव्या बाजूच्या रस्ता काँक्रीटीकरण कामाला सुरुवात करून फोरलेन मार्गावरील सुविधा , बाजू पट्टे , दुभाजक , त्यामधील हिरवळ , आदी सदर कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याची सूचना सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली . वर्दळीच्या फोरलेन मार्गावरून वरून सायकल स्वारांनाही अवागमनाची सुविधा व्हावी म्हणून फोरलेन मार्गाच्या दुतर्फा फुटपाथ ऐवजी सायकल ट्रॅक उभारण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना आमदार महोदयांच्या वतीने मांडण्यात आल्याने त्यावरही काम चालू असल्याचे सार्वजनिक बांधकाम अभियंत्याच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.
या पाहणी दरम्यान आ. सौ . सुलभाताई खोडके यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके ,सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता – एस.पी. थोटांगे, सहाय्यक अभियंता श्रेणी १ एन.आर. देशमुख, शाखा अभियंता संदीप ठाकुर, जे. पी इंटरप्राइजेस कंपनीचे कंत्राटदार सरोज पांडे , इंजिनियर निखिल फुटाणे , अभिजीत यावुल , तुषार दळवी, विनीत भाटिया , अविनाश मार्डीकर , माजी महापौर ऍड किशोर शेळके ,नगरसेवक प्रशांत डवरे ,प्रमोद महल्ले , प्रशांत महल्ले , योगेश सवाई , भोजराज काळे , यश खोडके, नितीन भेटाळू , आकाश वडनेरकर, सुयोग तायडे , दिनेश देशमुख , मनोज केवले , निलेश शर्मा, प्रशांत धर्माळे , बंडू निंभोरकर , प्रशांत पेठे , प्रवीण भोरे , धीरज श्रीवास , मदन जैस्वाल , मनीष बजाज ,भूषण बनसोड , महेश साहू , श्याम लकडे , बाळासाहेब देशमुख , संजय बोबडे , अमोल वानखडे , गजानन बरडे , किशोर भुयार , किशोर देशमुख , मनीष देशमुख , अशोक हजारे , प्रा. श्याम दळवी , आशिष राऊत , श्रीकांत झंवर , मनीष करवा , सुभाष भावे , प्रा . सुनील कांडलकर, विनोद देशमुख , पंकज थोरात , बाळासाहेब होले , पप्पूशेठ खत्री ,शिवपाल ठाकूर ,संजय यादव , शशिकांत चौधरी , संजय मळनकर , संदीप आवारे , प्रवीण आकोडे , राजीव ठवरे , सचिन वानखडे , चेतन वाठोडकर , अमोल देशमुख , उज्वल मोरे , विजय बाभुळकर , ऍड . प्रदीप प्रेमलवार , बंडूभाऊ धोटे , श्रीधर देशमुख , ऍड . सुनील बोळे , ऍड . विनोद नागपुरे , दीपक कोरपे , प्रमोद सांगोले , प्रवीण मेश्राम , रत्नदीप बागडे , राजेश जायले , उमेश बिजवे , प्रा. अजय बोन्डे , जितेंद्रसिह ठाकूर , शक्ती तिडके , सुनील रायटे , मनीष देशमुख , महेंद्र भुतडा , वीरेंद्र भोयर ,गोपाल चिखलकर , राजाभाऊ लुंगे , अजय कोळपकर ,जयकुमार नागे , सतीश रोंघे , लक्ष्मीकांत यादव , श्रीकांत ठोसर , कर्नलसिह राहल, लकी नंदा , राजेश कोरडे , अंकुश नावरे , विनय निशानदार , विक्रम खोडके , अमित सोनटक्के , प्रा .रमेश काळे , मनोज गावंडे , विनोद काळे , भैयासाहेब भारसाकळे , नाना पानसरे , विलास रिठे , पिंटू मानकर ,अखिल हाते , प्रशांत यावले , सतीश गुल्हाने , दत्तात्रय बागल , राजेंद्र कुऱ्हेकर , संजय देशमुख , प्रज्वल घोम , छोटू देशमुख , यशवंत गुडधे , राजाभाऊ देशमुख , पुरुषोत्तम गावंडे , रवींद्र भटकर , राजेंद्र कश्यप , दिलीप साखरे , विलास काळे , पवन वानखडे , स्मित माथुरकर, धीरज हिवसे , सचिन रहाटे , नंदकिशोर काळे , दिलीप कडू , प्रदीप वानखडे , आशिष राऊत , आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .