नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श समोर ठेवून समाजातील प्रत्येक नागरिकाने पुढे जावे – मा.आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श समोर ठेवून समाजातील प्रत्येक नागरिकाने पुढे जावे – मा.आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन

अक्षय गोंगले

म मराठी न्यूज नेटवर्क

तालुका प्रतिनिधी मुलचेरा

मो.8261809463

मुलचेरा : आज दिनांक 23 जानेवारी 2022 रोज रविवार मुलचेरा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस स्मारक समिती द्वारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे अनावरण मा. आमदार धर्मरावबाबा आत्राम , मा.वन मंत्री यांचे शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय डॉ. देवराव होळी, तथा प्रमुख अतिथी सौ. भाग्यश्री ताई आत्राम हे होते. कार्यक्रमात प्रामुख्याने श्री. युधिष्ठिर बिश्वास , बांधकाम सभापती, जिल्हा परिषद गडचिरोली, वन वैभव शिक्षण मंडळ चे उपाध्यक्ष मा. बबलू हकीम, गडचिरोली जिल्हय़ाचे महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सौ. शाहीन भाभी हकीम उपस्थित होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आदर्श पुढे ठेवून समाजातील प्रत्येक नागरिकाने पुढे जावे असे आवाहन उद्घाटनप्रसंगी मा. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. तसेच बंगाली समाजच्या उन्नती करिता आपण सतत कार्य करत राहणार असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. देवराव होळी यांनी केले,

या कार्यक्रमात प्रामुख्याने रॉबिन शहा जिल्हा परिषद सदस्य, सौ. सुवर्णाताई येमूलवार सभापती पंचायत समिती मुलचेरा ,सौ. पुष्पाताई बंडावार उपसभापती पंचायत समिती मुलचेरा, प्राचार्य डॉ. रंजित मंडल , बादलजी शहा , शंकरजी हलदार , प्रकाशजी दत्ता, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण डॉ. रंजीत मंडल यांनी केले, तर सूत्रसंचालन बिश्वजित बाईन व आभार प्रदर्शन श्री . अपूर्व मुजूमदार यांनी मानले.

Updated : 24 Jan 2022 2:49 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.