नॅशनल हायवे रोडवर दरोडा घालणारी अटृल दरोडेखोरांची कुख्यात टोळी स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा यांचेकडुन जेरबंद..

नॅशनल हायवे रोडवर दरोडा घालणारी अटृल दरोडेखोरांची कुख्यात टोळी स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा यांचेकडुन जेरबंद..

“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

कैफियत याप्रमाणे आहे की,फिर्यादी नामे उमेश भैयालाल उरकुडे रा.भंडारा हे दि.०६-०४-२०२२ रोजी त्यांचे कडील कार क्रमांक एम.एच.३६/ए.जी. ६६३३ ने त्यांचे कुटुंबासह शेगाव वरून भंडाराकडे जात असतांना रात्रौ ०२.४५ वा.सुमारास अमरावती ते नागपुर हायवे रोडवरील चक्री घाटाचे पुढे असलेल्या सारवाडी गावाजवळ कोणीतरी अनोळखी आरोपीतांनी त्यांचे कार समोर खिळयांचा लाकडी पट्टा टाकुन त्यांची कार अडवुन त्यांना काठीणे मारहान व जखमी करून त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिणे व नगदी रक्कम असा जु.किं १,७८,३०० रू.चा माल जबरीने चोरून नेला त्याबाबत त्यांनी पोस्टे तळेगाव (शा) येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर दिनांक ०७-०४-२०२२ रोजी फिर्यादी नामे आकिब खान उस्मान खान, रा.वणी जि.यवतमाळ हे त्यांचेकडील कार क्रमांक एम.एच.२९/ए.डी.५७०८ ने नागपुर ते वणी जात असतांना हिरडीफाटया जवळ कोणीतरी अनोळखी आरोपीतांनी त्यांचे कार समोर खिळयांचा लाकडी पट्टा टाकुन त्यांची कार अडवुन त्यांना काठीणे मारहाण व जखमी करून त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिणे व नगदी रक्कम असा जु.किं ६४,५००/- रू.चा माल जबरीने चोरून नेला त्याबाबत त्यांनी पोस्टे समुद्रपुर येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

वरील प्रमाणे हायवे रोड रॉबरीचे सलगपणे गुन्हे घडत असल्याने मा.पोलीस अधीक्षक वर्धा यांनी सदर गुन्हयांची गांभीर्य पुर्वक दखल घेवुन स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना तपासकामी मार्गदर्शन करून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत निर्देश दिले त्यानुसार तपास पथकांनी अशा प्रकारच्या गुन्हयांची व आरोपीतांची माहीती घेतली असता दिनांक ०३-०४-२०२२ रोजी फिर्यादी नामे कैलास भिवसेन जाधव रा.अशोक नगर, नाशिक हे त्यांचेकडील कार क्रमांक एम.एच.४८/पी.२१८७ ने इंदोर वरून धुळे कडे जात असतांना पहाटे ०४.०० वा.सुमारास बाभाळे फाटयाजवळ कोणीतरी अनोळखी आरोपीतांनी त्यांचे कार समोर खिळयांचा लाकडी पट्टा टाकुन त्यांची कार अडवुन त्यांना काठीणे मारहान व जखमी करून त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिणे व नगदी रक्कम असा जु.किं. १,३०,५०० रू.चा माल जबरीने चोरून नेला त्याबाबत त्यांनी पोस्टे सिंदखेडा येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

वरीलप्रमाणे घडलेल्या गुन्हयांचे बारकाईने अवलोकन करून तपास केला असता, अशा प्रकारची नॅशनल हायवे रोडवर गुन्हे करणारी टोळी सक्रीय असल्याचे आढळुन आले म्हणुन अशाप्रकारे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहीती संकलीत करून गोपनीयरित्या माहीती घेतली असता, मुखबीर कडुन बातमी मिळाली की, अशा प्रकारचे गुन्हे करणारी उस्मानाबाद जिल्हयातील एक टोळी सिल्वर रंगाची एसयुव्ही-५०० कार व बोलेरो गाडीचा वापर करून हायवे रोडवर गुन्हे करीत आहे व सदर टोळी ही सध्या नांदेड जिल्हयातील माहुरगड येथे आहे. त्यावरून जलदगतीने तपासचक्रे फिरवुन यातील तपास पथकांनी लगेच माहुरगड गाठुन तेथे गुप्त माहीती काढली व त्यानुसार सापळा रचुन सदर टोळीला त्यांचे ताब्यातील सिल्वर रंगाची एसयुव्ही-५०० कार क्र.एम.एच.२५/आर.३९२७ व बोलेरो वाहन क्र एम.एच.१३/ए.सी.८०८२ सह अत्यंत शिताफिने ताब्यात घेतले त्यांना त्यांची नाव पत्ते विचारता त्यांनी त्यांचे नावे खालीलप्रमाणे सांगितले.

१) बबलु अप्पा शिंदे, वय २८ वर्ष, रा. खामकरवाडी ता. वाशी, जि.उस्मानाबाद

२) दत्ता सुंदर शिंदे, वय ३५ वर्ष, रा. तेरखेडा ता. वाशी, जि.उस्मानाबाद

३) अमोल आप्पा शिंदे, वय ३२ वर्ष, रा. खामकरवाडी जि.उस्मानाबाद

४) सुनिल लहु काळे, वय २२ वर्ष, रा. कोठावळी, ता. कळंब, जि.उस्मानाबाद

५) महादेव अंन्सार काळे, वय २४ वर्ष, रा. खामकरवाडी, जि.उस्मानाबाद

६) सर्जेराव तात्याजी शिंदे, वय २५ वर्ष, रा. कोठावळी, ता.कळंब, जि.उस्मानाबाद

७) लहु राजेंद्र काळे, वय ४५ वर्ष, रा. कोठावळी, ता.कळंब, जि.उस्मानाबाद

८) उत्तम सुंदर शिंदे, वय ५० वर्ष, रा.खामकरवाडी, जि.उस्मानाबाद

९) विकास संजय शिंदे, वय २१ वर्ष, रा.तेरखेडा, जि.उस्मानाबाद.

वरील सर्व आरोपीतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना वर्धा व धुळे जिल्हयात घडलेल्या वरील गुन्हयांबाबत सखोल पणे विचारपुस केली असता, त्यांनी सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांना गुन्हयातील मालाबाबत विचारपुस केली असता सदर गुन्हयात व इतर गुन्हयात चोरलेले सोने चांदीचे दागिणे व पैसे त्यांचे ताब्यातील वरील वाहनांमध्ये लपवुन ठेवल्याचे सांगितल्याने सदर वाहनांची झडती घेतली असता, सदर वाहनांमध्ये २५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे किं. ७,५०,०००/- रु, ४५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे किं. २७,०००/- रु., नगदी रक्कम ४१,१५०/- रु., ७ मोबाईल किं. ४७,०००/- रु., दोन जॅक किंमत ४०००/- रु. तसेच गुन्हयात वापरलेली एसयुव्ही-५०० कार किंमत ९,००,०००/- रु. व बोलेरो गाडी किंमत ७,००,०००/- रु. असा एकुण जु.किं. *२४,६९,१५०* रू. चा माल पुढील तपासकामी जप्त करण्यात आला आहे. वरील सर्व आरोपीतांना पोस्टे समुद्रपुर येथील गुन्हयात दि.08.04.2022 रोजी 03.28 वा.अटक करण्यात आली. त्यांचा PCR घेऊन पुढील तपास सुरु आहे.

वरील आरोपीतांचा पुर्व इतिहास पाहिला असता नमुद सर्व आरोपी हे स्वतःची वाहने वापरून दरोडा,जबरी चोरी करण्याच्या सवयीचे असल्याचे दिसुन आले.

*सदरची कामगीरी मा. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा, मा.यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा.परिविक्षाधिन पोलीस अधिकारी शफकत आमना श्री.पियुष जगताप, उपविभागिय पोलीस अधिकारी वर्धा, श्री.दिनेश कदम उपविभागिय पोलीस अधिकारी, हिंगणघाट व श्री.संजय गायकवाड पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, श्री. प्रशांत काळे ठाणेदार समुद्रपुर, सपोनि आशिष गजभिये, ठाणेदार तळेगाव यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा.चे सपोनि महेंद्र इंगळे, पोउपनि अमोल लगड, पोउपनि राम खोत सफौ. प्रमोद जांभुळकर, संतोष दरगुडे, निरंजन वरभे, गजानन लामसे, नरेंद्र डहाके, हमीद शेख, चंदु बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, रणजित काकडे, प्रमोद पिसे, यशवंत गोल्हर, राजेश जैयसिंगपुरे, गोपाल बावणकर, रितेश शर्मा, मनिष कांबळे, अभिजीत वाघमारे, अमोल ढोबाळे, नितेश मेश्राम, अविनाश बन्सोड, संजय बोगा, अनिल कांबळे, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेष आष्टणकर, निलेश कट्टोजवार, अक्षय राउत, अंकित जिभे, अरविंद येनुरकर, वैभव चरडे, रवि पुरोहित, अमोल चौधरी मनापोशि शाहीन सैयद, स्मिता महाजन यांनी केली*

Updated : 8 April 2022 3:09 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.