धान खरेदी ची मुदत वाढवा. जि. प.सदस्य विनोद लेनगुरे यांची निवेदनातुन मागणी..

धानोरा तालुका प्रतिनिधी दिवाकर भोयर मो.न.९४२१६६०५२३
गडचिरोलि जिल्ह्यात धान कटाई केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी साचून असल्याने धान मळणी चे कामे खोळंबून होति. अवकाळी पाण्यामुळेच शेतात आजही धान मळणी यंत्र जाऊ शकत नाही.त्यामुळे अनेक शेतकर्याची धान मळनी झालीच नाही. अशातच धान खरेदी ची मुदत ३१ जानेवारी २०२२ पर्यंत असल्यामुळे शेतकऱ्यांना धान विक्रीपासून वंचित राहावे लागणा आहे. त्यामूळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यावर फार मोठे आर्थिक संकट ओढवले जाणार आहे. करीता सदर बाबींची गंभीर दखल घेऊन आदिवासी विविध सहकारी संस्थांमार्फत चालु असलेली धान खरेदीची मुदत वाढवून देण्याच्या मागणी चे निवेदन धानोरा तहसिलदार यांचे मार्फत मा. जिल्हाधिकारी यांना आज दिनांक 27/01/2022 पाठवून करन्यात आली .
निवेदन देताना
जिल्हा परिषदेचे सदस्य विनोद लेनगुरे, माजी उपसरपंच धानोरा तथा नगरसेवक राजु मोहूर्ले, माजी सरपंच धानोरा तथा नगरसेवक माणिकशहा मडावी, कामनगडचे सरपंच संजय गावडे, नगरसेवक भुषण उंदीरवाडे, गिरिधर सोनुले आदी उपस्थित होते.