दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे महिला उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे महिला उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत उद्योजकता व कौशल्य विकास केंद्र दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुड (पुसद) जि. यवतमाळ द्वारे अनुसूचित जाती उपघटकातील महिलांकरिता गौतमी बुद्ध विहार, श्रावस्ती सोसायटी, पाटीपुरा, यवतमाळ येथे दिनांक २९ मार्च २०२२ रोजी एकदिवसीय दुग्धव्यवसाय उद्योजकता कौशल्य विकास शिबीर आयोजित करण्यात आले. शिबिरात एकूण ३९ महिलांनी सहभाग नोंदविला.

मान्यवरांनीं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन प्रशिक्षणास सुरुवात केली. उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. प्रमोदिनी विठ्ठलराव रामटेके, समाजसेविका तथा उदघाटक म्हणून सौ. पल्लवी ताई रामटेके, नगरसेविका पाटीपुरा, यवतमाळ उपस्थित होत्या. प्रशिक्षणाचे मुख्य समनवयक तथा उद्याजकता कौशल्य विकास केंद्र दुग्ध तंत्रज्ञान महविद्यालय पुसद चे प्रभारी अधिकारी डॉ. भूषण मेश्राम यांनी प्रशिक्षणार्थींना थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेषा व प्रयोजन विशद केले. पल्लवी रामटेके नगरसेविका यांनी प्रशिक्षणार्थी ना उद्बोधन करताना दुग्धव्यवसाय चे सामाजिक तसेच आर्थिक महत्व विशद केले तसेच महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरु केल्यास त्याला यवतमाळ शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची हमी दिली. प्रशिक्षणादरम्यान दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुड पुसद येथील डॉ. हेमंत गावंडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दुधाची गुणवत्ता तपासणी व दुधातील भेसळ ओळखणे या विषयावर मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक करून दाखविले. डॉ. मेश्राम यांनी प्रशिक्षणार्थीना दुधापासून पेढा ,बर्फी, खोवा, छन्ना, पनीर, श्रीखंड आदी दुग्धपदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रात्यक्षिक करतांना प्रशिक्षणार्थीनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमादरम्यान पल्लवी रामटेके नगरसेविका यांचे हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी सुद्धा आपला अनुभव कथन केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मृणालिनी दहीकर यांनी केले . प्रशिक्षणाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. वासनिक यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण मुख्य समन्वयक डॉ. भूषण मेश्राम तसेच सह समन्वयक डॉ. गावंडे, श्री. प्रकाश डोंगरे, श्री. संजय पानझाडे यांनी पुढाकार घेतला . तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ. मृणालिनी दहीकर,आकाशवाणी केंद्र, यवतमाळ तथा प्रमोदिनी रामटेके व पल्लवी रामटेके यांचे विशेष सहाय्य लाभले.
