दिल्ली वेसच्या वाढीव निधीचा प्रश्न मार्गी

दिल्ली वेसच्या वाढीव निधीचा प्रश्न मार्गी
फुलचंद भगत
वाशिम:-कारंजा शहराला ऐतिहासिक वारसा असून या ठिकाणी ऐतिहासिक चार मुख्य वेशी आहेत या चारही वेशी जीर्ण स्वरूपाच्या झाल्यामुळे पुरातत्व विभागाकडून या वेशीच्या नूतनीकरण व दुरुस्ती चे कार्य गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे यातील मंगरूळ पीर वेस व पोह वेशीचे काम पूर्ण झाले असून या दोन्ही वेशी रहदारी साठी खुल्या करून देण्यात आल्या आहेत परंतु अतिशय वर्दळीच्या व कारंजा शहराच्या मुख्य बाजापेठेला जोडणाऱ्या दिल्ली वेशीचे काम निधी अभावी रखडलेले आहे या वेशीच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी यापूर्वी सुद्धा पाठपुरावा करण्यात आला या कामासाठी एकूण ३ कोटी ५१ लाख रुपयांचा निधीची आवश्यकता असल्यामुळे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेशी राका नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी, कारंजा नप माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके,यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक अशोक परळीकर व अकोला जिल्हा पक्ष निरीक्षक सौ सोनाली ठाकूर यांनी भेट घेऊन सदर दिल्ली वेस वाढीव निधीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विस्तृत चर्चा केली.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्ली वेस दुरुस्ती साठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच कारवाई करून प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले त्यामुळे लवकरच दिल्ली वेस दुरुस्ती कार्याला गती मिळून रहदारीची समस्या निकाली निघण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.