दिपक कांबळे यांची सहा . पो . उपनिरिक्षकपदी पदोन्नती

दिपक कांबळे यांची सहा . पो . उपनिरिक्षकपदी पदोन्नती

उमरखेड : – अतिसंवेदनशिल शहर म्हणून गृह खात्याच्या दप्तरी नोंद असलेल्या उमरखेड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शांतता नांदावी यासाठी आपल्या प्रदिर्घ कार्य काळात आपले कर्तव्य चोख बजावून शहरातील तसेच गाव गाड्यातील सर्व धर्मिय , राजकिय व सामाजिक क्षेत्रातील तसेच सर्व सामान्य नागरिकांशी सुसंवाद साधून जिल्हा विशेष शाखेमध्ये गोपनिय पोलीस म्हणून कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी दिपक कांबळे यांची सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक म्हणून नुकतिच पदोन्नती झाली त्यांच्या कार्य काळाचा आढावा घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी त्यांचे बॅच लाऊन स्वागत केले आहे .

पुसद तालुक्यातील आरेगाव हे त्यांचे मुळगाव असून सन 1991 ला पोलीस दलात कार्यरत झाल्यानंतर त्यांनी दारव्हा , वडगाव रोड (यवतमाळ ) .पुसद ग्रामिण, महागाव, अशा विविध ठिकाणी आपले कर्तव्य बजावले आहे . 20O8 मध्ये त्यांना प्रथम पदोन्नती , सन 20 11 मध्ये व्दितीय मिळाल्यानंतर सन 2o22 मध्ये तिसरी पदोन्नती त्यांना पोलीस विभागाकडून प्राप्त झाली . यवतमाळ जिल्हा विशेष शाखेत कार्यरत राहुन जातीय सलोखा कायम राहावा यासाठी त्यांनी परिश्रम घेतले आहे . त्यांचा सर्वाधिक कार्यकाळ उमरखेड पोलीस स्टेशनला राहीला आहे .

Updated : 23 Jan 2022 6:54 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.