दाक्षिणात्य सुपरस्टार ‘चिरंजीवी’ करोना पॉझिटिव्ह; फॅन्सची चिंता वाढली

दाक्षिणात्य सुपरस्टार ‘चिरंजीवी’ करोना पॉझिटिव्ह; फॅन्सची चिंता वाढली

नवी दिल्ली – दाक्षिणात्य सुपरस्टार ‘चिरंजीवी’ यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्वतः चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. दरम्यान, चिरंजीवींची ही पोस्ट पाहून त्यांचे चाहते त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. सध्या सोशल मीडियावर #Chiranjeevi ट्रेंड करत आहे. अभिनेते ‘चिरंजीवी’ यांचा देशातच नव्हे तर परदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या ऍक्शन आणि हटके अंदाजामुळे ते सर्वांच्या गळ्याचे ताईत बनले आहेत.

आपल्या पोस्टमध्ये चिरंजीवी म्हणतात की.., “सर्व नियमांचे पालन करून सुद्धा माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सौम्य लक्षण जाणवल्यानंतर मी काल रात्री करोनाची चाचणी केली. तेव्हा कळालं की मला करोनाची लागण झाली आहे. मी घरीच क्वारंटाईन झालो आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी ही विनंती.’ या आशयाची पोस्ट अभिनेते चिरंजीवी यांनी केली आहे.

चिरंजीवी यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास 1 एप्रिल 2022 रोजी त्यांच्या ‘आचार्या’ हा आगामी चित्रपट रिलीज होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरटाळा शीवयांनी केले आहे. चिरंजीवी यांच्यासोबतच राम चरण, काजल अग्रवाल आणि पूजा हेगडे यांनी देखील चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.