थंडी, धुक्यामुळे रेल्वेने 481 गाड्या केल्या रद्द; प्रवासाला जाण्याआधी जाणून घ्या ‘ही’ यादी

थंडी, धुक्यामुळे रेल्वेने 481 गाड्या केल्या रद्द; प्रवासाला जाण्याआधी जाणून घ्या ‘ही’ यादी

देशभरात कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वेच्याही अडचणी वाढल्या आहेत. धुक्यामुळे रेल्वेने 481 गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे तुम्हीही कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल तर एकदा NTES वर जा आणि तुमच्या ट्रेनची सर्व माहिती मिळवा. अन्यथा तुम्हाला खूप त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

थंडीबरोबर अनेक ठिकाणी ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामही सुरू आहे. त्यामुळे रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. याविषयी नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टमच्या अधिकृत वेबसाइटवर रेल्वेने ही माहिती दिली आहे.

या मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या

22406 आनंद विहार – भागलपूर गरीब रथ (24 जानेवारी रोजी रद्द)
22405 भागलपूर-आनंद विहार गरीब रथ (23 जानेवारी रोजी रद्द)
13419 भागलपूर-मुझफ्फरपूर जनसेवा एक्सप्रेस (23 ते 27 जानेवारीपर्यंत रद्द)

डाऊनमध्ये भागलपूर-मुझफ्फरपूर जनसेवा एक्सप्रेस 23 ते 27 रद्द राहतील.

13236 दानापूर-साहिबगंज
13235 साहिबगंज-दानापूर इंटरसिटी एक्सप्रेस (27 ते 28 जानेवारीपर्यंत रद्द)
15553 जयनगर- भागलपूर (24-28)
15554 भागलपूर-जयनगर एक्सप्रेस (रद्द 23-27 जानेवारी)
13242 राजेंद्रनगर – बांका (24-26)
13241 बांका-राजेंद्रनगर इंटरसिटी (25-27 जानेवारी) पर्यंत रद्द केली आहे.

या गाड्यांच्या मार्गात बदल
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या सर्व गाड्या 28 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यासोबतच साहिबगंज-जमालपूर, भागलपूर-जमालपूर, जमालपूर-क्युल दरम्यान धावणाऱ्या 9 पॅसेंजर ट्रेनही 22 ते 28 जानेवारीदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
आणि 13409/13410 मालदा-क्युल 28 जानेवारीपर्यंत फक्त भागलपूर स्टेशनपर्यंत धावेल.


Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.