तिसऱ्या वनडेतही भारतीय संघ ढेपाळला ! दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियाला “व्हॉईट वॉश” !

तिसऱ्या वनडेतही भारतीय संघ ढेपाळला ! दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियाला “व्हॉईट वॉश” !

केपटाऊन – ढेपाळलेली गोलंदाजी आणि फलंदाजी यामुळे भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत व्हाईट वॉशला सामोरं जावं लागलं. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला नमवून एकदिवसीय क्रिकेट मालिका ३-० अशा फरकाने जिंकली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने ४९.५ षटकांत सर्वबाद २८७ धावा केल्या. प्रत्युत्तर भारतीय संघ ४९.२ षटकांत २८३ धावांत गारद झाला. भारताकडून शिखर धवनने ६१ आणि विराट कोहलीने ६५ धावा केल्या. तर दीपक चहरने एकाकी झुंज देत ५४ धावा केल्या. मात्र भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंग एंगडी आणि अँडिल फेल्युक्वायो यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिस-या आणि मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. भारताची चांगली सुरुवात होऊनही डी कॉक आणि ड्युसेन यांनी आफ्रिकेचा डाव सावरत 287 धावा स्कोरबोर्डवर लावत भारतासमोर 288 धावांचे आव्हान ठेवले आहे.

कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चाहरने सार्थ ठरवला. दीपक चाहरने वैयक्तिक दुसऱ्या षटकात आफ्रिकेला पहिला धक्का दिला. त्याने जानेमन मलानला यष्टीरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ टेम्बा बवुमा 8 धावांवर, तर एडन मार्क्रम 15 धावांवर झटपट बाद झाले. यामुळे आफ्रिकेची 3 बाद 70 धावा अशी स्थिती झाली.

दुसरीकडे सलामीवीर क्विंटन डीकॉकने एक बाजू लावून धरली होती. डीकॉकने डुसें याच्यासोबत 144 धावांची भागीदारी करत संघाच्या डावाला आकार दिला. त्याने शतकी खेळीसह संघाला सामन्यात निर्णायक आव्हान उभारून दिले. डीकॉकने 130 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 124 धावांची खेळी केली. दरम्यान, डुसे याने 59 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा फटकाविल्या.

ही भागिदारी जसप्रीत बुमराहने मोडली. त्याने शतकवीर क्विंटन डीकॉकला शिखर धवनकरवी झेलबाद केले. तर 37व्या षटकात युजवेंद्र चहलने रॅस्सी वॅन डेर डुसेंला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करत माघारी पाठविले. ही जोडी माघारी परतल्यावर डेव्हिड मिलरने थोडा प्रतिकार केला. मात्र भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकात पुनरागमन केले. भारताकडून प्रसिध कृष्णाने 3 गडी बाद केले. तर दीपक चहर, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन-दोन, तर युझवेंद्र चहलने एक विकेट घेतली आहे.

 

 


Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.