तहसिल कार्यालय बुधवारी फेरफार अदालत: शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे तहसिलदार सतिश मासाळ यांचे आवाहन..

वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी
मोहम्मद इक्बाल
हिंगणघाट शहरातील तहसिल कार्यालयात बुधवार ९ मार्चला फेरफार अदालत चे आयोजन करण्यात आले आहे.या फेरफार अदालतात मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन तहसिलदार सतिश मासाळ यांनी आज शुक्रवारी शेतकऱ्यांना केले आहे. ज्या नागरीकांचे फेरफार प्रलंबीत असतील अथवा फेरफार संबंधी काही अडचणी असतील त्यांनी ९ मार्चला सकाळी 11.00 वाजता पासुन तहसिल कार्यालयात हजर रहावे या दिवशी सर्व प्रलंबीत फेरफार निकाली काढण्यात येतील अशी माहिती तहसिलदार सतिश मासाळ यांनी दिली आहे.
Updated : 5 March 2022 4:22 AM GMT