तहसिलदार शितल बंडगर यांनी घेतला 'सुंदर आपले कार्यालय' ऊपक्रमाचा आणी प्रजासत्ताकदिन कार्यक्रमाचा आढावा

तहसिलदार शितल बंडगर यांनी घेतला 'सुंदर आपले कार्यालय' ऊपक्रमाचा आणी प्रजासत्ताकदिन कार्यक्रमाचा आढावा

(फुलचंद भगत)

वाशिम:-येणार्‍या प्रजासत्ताकदिनाच्या नियोजनाचे तसेच ‘सुंदर आपले कार्यालय’ऊपक्रमाचा आढावा तहसिलदार शितल बंडगर यांनी घेतला असुन शासकीय नियमाने प्रशासन चालवण्यासाठी कटिबध्द असलेल्या महसुल कर्मचार्‍यांना सुचनाही दिल्या आहेत.

तालुक्याचे तहसिल कार्यालय म्हणजे महसुलचा कणा असतो.परंतु या कार्यालयाला माञ अस्वच्छतेचे ग्रहण लागले होते.कर्मचारीही लेटलतिफ झाले होते.मनमानीपणे वागुन नाहक जनतेला ञास होत होता.वेळेच्या आधिच कार्यालयातुन निघुन जाण्याचे प्रकारही वाढले.याबाबीची दखल काही दिवसापुर्वीच रुजु झालेल्या तहसिलदार शितल बंडगर यांनी घेवुन कर्मचार्‍यांना सुचना दिल्या व पारदर्शक शासनप्रणालीसाठी सर्वांनी जनताकेंद्रित कामे करण्यावर भर देण्याचेही सांगीतले.कर्तव्यदक्ष ना.तहसिलदार रवि राठोड,दिलीप चौधरी,वाडेकर यांनीही कार्यालय सर्वांग सुंदर आणी स्वच्छ राहावे जेणेकरुन परिसर चांगला दिसेल आणी लोकांची वेळेत कामे होतील यावर भर दिला.तहसिलचा चेहरामोहरा बदलत असुन या तहसिल इमारतीला रंगरंगोटी देवुन विभागही स्वच्छ आणी सुंदर बनवन्याचे काम सुरु आहे.

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 24 Jan 2022 8:29 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.