डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समता ओलंपियाड परीक्षेचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समता ओलंपियाड परीक्षेचे आयोजन
विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
प्रतिनिधी यवतमाळ
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता पर्व प्रतिष्ठान व समता डॉक्टर असोसिएशन यवतमाळ द्वारा “समता ओलंपियाड २०२२” रविवार दिनांक 10 एप्रिल २०२२ ला दुपारी १२ ते १.३० पर्यंत परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. परीक्षेमध्ये ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न हा ४ मार्काचा असून २०० गुणांची ही परीक्षा असणार आहे. परीक्षेमध्ये प्रथम पुरस्कार ७००० रुपये (सात हजार रुपये) व्दितीय पुरस्कार ५००० रुपये (पाच हजार रुपये) तृतीय पुरस्कार ३००० रुपये (तिन हजार रुपये) व ७ प्रोत्साहनपर पुरस्कार प्रत्येकी १००० रुपये असणार आहे. यामध्ये १६ वर्षा पर्यंत सर्वांना सहभागी होता येईल. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र रायटिंग पॅड व पेन मिळेल तसेच पेपर हा इयत्ता आठवी, नववी व दहावी गणित आणि विज्ञान विषयावर असणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन रविवार दिनांक 10/०४/२०२२ ला सकाळी ११.०० वाजता एस्पायर सायन्स अकॅडमी शिवाजी नगर यवतमाळ येथे होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहरराव शहारे तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन अड रामदास राऊत अध्यक्ष समता पर्व २०२२ तसेच डॉ सुनील भवरे, डॉ.अरुण जनबंधू, डॉ. विवेक गुजर, डॉ. शेखर घोडेस्वार, डॉ. मिलिंद गजभिये, डॉ. अनिल उमरे, डॉ. सचिन बनसोडे, डॉ. प्रशांत तामगाडगे, डॉ. सुशील वानखडे, डॉ. निलेश उके आदींच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन डॉ. नीलेश उके, डॉ. स्नेहल दिघाडे संचालिका अकॅडमी यवतमाळ, डॉ. सुशील वानखडे, अमोल उके संचालक केअरिंग हॅन्ड फाउंडेशन यांचे असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी महेंद्र वाणी (7620158247) सुबोध मेश्राम. (9595658188) डॉ. स्नेहल उके अमोल उके (9860344518) यांच्याकडे फोन करुन नोंदणी करावी. नोंदणी दिनांक ३० मार्च २०२२ ते 8 एप्रिल २०२२ पर्यंत असणार आहे. नोंदणीशुल्क प्रत्येकी १०० रुपये असणार आहे. परीक्षेचे केंद्र हे आस्पायर सायन्स अकॅडमी शिवाजी ग्राउंड समोर शिवाजी नगर यवतमाळ हे राहणार असून बक्षीस वितरण समारंभ हा 13 एप्रिल 2022 ला सायंकाळी समारोपीय सत्रामध्ये समता मैदान यवतमाळ येथे होणार असल्याचे डॉ. स्नेहल उके यांनी कळविले आहे.