डॉ कोळपे इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी कोळपेवाङी रक्तदान शिबिर आणि महिला दिन साजरा करण्यात आला

डॉ कोळपे इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी कोळपेवाङी येथे रक्तदान शिबिर आणि महिला दिन साजरा करण्यात आला


कोळपेवाङी येथील डॉ कोळपे इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी येथे मंगळवार दि ८ मार्च रोजी रक्तदान शिबीर तसेच जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रकाश जानकु कोळपे उपाध्यक्ष सुरेखाताई कोळपे डॉ धनंजय कोळपे प्रमुख अतिथी डॉ राजश्री कोळपे डॉ श्वेता कोळपे तसेच सौ लताताई संजय कापसे प्रशासकीय श्री संजय निवृत्ती कापसे प्राचार्य श्री अमोल उत्तमराव गायके आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी सौ सुरेखाताई प्रकाश कोळपे यांनी शिक्षणातून महिला सक्षमीकरणाकङे या विषयावर महिलांना आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले

यावेळी अर्पण ब्लङ बॅक यांनी रक्तदान शिबीर आयोजित केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रकाश कोळपे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख प्रा श्री सचिन आगलावे प्रा श्री सुरज बेद्रे प्रा कुलदीपक पारखे प्रियंका वैराळ ,प्रा पुजा खेमनर प्रा कांचन गुरसळ यांचे सहकार्य लाभले संस्कृतीक विभाग प्रमुख प्रा स्वप्निल हरिशचंद्रे यांनी सर्वांचे आभार मानले
