डॉ.अबरार अहमद खान यांची वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया ची नॅशनल फेडरल वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी निवड

डॉ.अबरार अहमद खान यांची वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया ची नॅशनल फेडरल वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी निवड

डॉ.अबरार अहमद खान यांची वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया ची नॅशनल फेडरल वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी निवड

यवतमाळ : 18 एप्रिल 2011 रोजी नैतिक सिद्धांतांवर स्थापन झालेली वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया हे भारतीय राजकारणात आपल्या नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणातून समाजकार्य करणारी एकमेव पार्टी आहे. राजकारणात भ्रष्टाचार करून राजकारणाला मलिन करून या देशाची विल्हेवाट लावणारे राजकारणी लोकांना नैतिक सिद्धांतांवर आधारित राजकारण करून एक नवी दिशा देण्याचे काम वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय व राज्यस्तरावर करीत आहे.आपल्या नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणाच्या विस्तारा करण्याकरिता नुकतीच गोवा येथे वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया ची नॅशनल फेडरल वर्किंग कमिटीची बैठक सोमवार दिनांक 21 मार्च 2022 रोजी संपन्न झाली.

या बैठकीत नॅशनल फेडरल वर्किंग कमिटीच्या सदस्यांशी सल्लामसलत करून वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष कासिम रसूल इलियास यांनी उर्वरित कार्यकाळासाठी त्वरित प्रभावाने डॉ.अबरार अहमद खान यांना वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया ची नॅशनल फेडरल वर्किंग कमिटीच्या सदस्य म्हणून नामित केले.लक्षात असू द्या डॉ.अबरार अहमद खान हे वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे सुरुवातीपासून एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्य करत आहे सन 2014 साठी त्यांनी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लोकसभाचे निवडणूक लढविले होते वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या सुरुवाती दौरा पासून ते पार्टीशी जोडलेले आहे.सध्या ते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहे.

सदर नियुक्तीचे परिपत्रक वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे वतीने शुक्रवार दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव सुब्रमणि अरुमुगम यांचे स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे. आपल्या या नियुक्तीबद्दल डॉ.अबरार अहमद खान यांनी सर्वप्रथम अल्लाह यांचे आभार मानले तसेच आपली या नियुक्तीबद्दल वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.कासिम रसूल इलियास साहेब यांचे तसेच नॅशनल फेडरल वर्किंग कमिटीच्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानले.डॉ.अबरार अहमद खान यांची या नियुक्तीची बातमी कळताच यवतमाळ शहर,जिल्हा तसेच प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Updated : 6 April 2022 7:22 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.