जो करता है सेवाभाव, उसका नाम है देवराव – आ. सुधीर मुनगंटीवार घुग्‍गुस येथील आ. सुधीर मुनगंटीवार क्रिडा व सांस्‍कृतीक महोत्‍सव व सुधीरभाऊ सेवा केंद्र येथे उपस्थिती. श्री. देवराव भोंगळे यांच्‍या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

जो करता है सेवाभाव, उसका नाम है देवराव – आ. सुधीर मुनगंटीवार

घुग्‍गुस येथील आ. सुधीर मुनगंटीवार क्रिडा व सांस्‍कृतीक महोत्‍सव व सुधीरभाऊ सेवा केंद्र येथे उपस्थिती.

श्री. देवराव भोंगळे यांच्‍या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

मनुष्‍याला मानव जन्‍म हा अनेक कष्‍टानंतर मिळतो. त्‍या जन्‍मात गोरगरीब, पिडीत, शोषीत समाजाच्‍या भल्‍यासाठी काम करणे हीच खरी ईश्‍वरीय सेवा आहे व हे काम देवराव भोंगळे गेल्‍या अनेक वर्षांपासून अतिशय निष्‍ठेने व जोमाने करीत आहे हे अतिशय कौतुकास्‍पद आहे, असे उद्गार विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. घुग्‍गुस येथे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रिडा व सांस्‍कृतीक महोत्‍सवाअंतर्गत गुढीपाडवा उत्‍सव व सांस्‍कृतीक महिला सम्‍मेलनाचे आयोजन करण्‍यात आले होते. यामध्‍ये महिलांच्‍या विविध कलागुणांचे सादरीकरण करण्‍यात आले. विविध क्षेत्रात काम करणा-या महिलांच्‍या रूपात घुग्‍गुस मधील महिलांनी आपले कलागुण सादर केले. यामध्‍ये विविध प्रकारची नृत्‍ये, फॅन्‍सी ड्रेस कॉम्‍पीटिशन, देशभक्‍तीपर नृत्‍य, समुह नृत्‍य सादर करण्‍यात आली. यावेळी मंचावर भाजपा ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा महिला प्रदेश उपाध्‍यक्षा वनिता कानडे, चंद्रपूरच्‍या महापौर राखी कंचर्लावार, चंद्रपूरचे उपमहापौर राहूल पावडे, जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य नितू चौधरी, भाजयुमो प्रदेश उपाध्‍यक्ष विवेक बोढे, भाजपा जिल्‍हा महासचिव नामदेव डाहूले, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, विजय पिदुरकर, अनिल डोंगरे, विनोद चौधरी, संजय तिवारी, संतोष नुने, निरीक्षण तांड्रा उपस्थिती होते. भाजपा महिला आघाडी तथा प्रयास सखी मंच घुग्‍गुसतर्फे दिनांक १ एप्रिल व २ एप्रिल रोजी प्रयास सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले. यामध्‍ये १ एप्रिल रोजी महिलांचे विविध कार्यक्रम करण्‍यात आले. ज्‍यामध्‍ये रांगोळी स्‍पर्धा, निंबू चमचा स्‍पर्धा, बोरा रेस स्‍पर्धा, रस्‍सी खेच स्‍पर्धा, संगीता खुर्ची स्‍पर्धा घेण्‍यात आली. याप्रसंगी देवराव भोंगळे यांचे यथोचित मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सौ. अर्चना देवराव भोंगळे यांनी, संचालन सौ. किरण विवेक बोढे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. सुचिता लुटे यांनी केले.

याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले की देवराव भोंगळे व त्‍यांची चमू गेल्‍या अनेक वर्षांपासून अनेक लोकोपयोगी कामे करीत आहेत. ज्‍यामध्‍ये आरोग्‍य शिबीरे, रक्‍तदान शिबीर, घरकुलांसाठी मदत, शहराचा पाणी पुरवठा नियमित करणे, रस्‍ते, नाल्‍या, लाईट, हायमास्‍ट यांचा समावेश आहे. असे कार्य त्‍यांच्‍या हातुन निरंतर सुरू राहो अशा शुभेच्‍छा आ. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिल्‍या.

या कार्यक्रमाआधी आ. मुनगंटीवार यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राला भेट दिली. गेल्‍या अनेक वर्षांपासून या सेवाकेंद्राच्‍या माध्‍यमातुन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, उज्‍वला योजना, बचतगट, आयुष्‍यमान भारत, प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, पॅनकार्ड, उत्‍पन्‍न दाखला, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट, अटल विश्‍वकर्मा सन्‍मान कामगार योजना, विवाह नोंदणी, जातीचा दाखला, जीएसटी नोंदणी, विदेशात जाण्‍यासाठी पोलिस क्‍लीरीयन्‍स, डोमिसियल सर्टीफिकेट, अन्‍न परवाना कागदपत्रे सुकन्‍या समृध्‍दी योजना, महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना, उद्योग आधार साठी आवश्‍यक कागदपत्रे, ई-श्रमकार्ड, शेतमजूर दाखला, राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजना या सर्व योजनांसाठी योग्‍य मार्गदर्शन केल्‍या जाते. या सेवाकेंद्राच्‍या माध्‍यमातुन केल्‍या जाणा-या कामांचे आ. मुनगंटीवार यांनी भरभरून कौतुक केले व असेच कार्य त्‍यांच्‍या हातुन होवो अशा शुभेच्‍छा दिल्‍या.

कार्यक्रमाच्‍या सुरूवातीला घुग्‍गुस शहरातील महिलांनी घुग्‍गुस शहराच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच गुढीपाडव्‍यानिमीत्‍त भव्‍य मोटार सायकल रॅली काढली. या रॅलीत ३०० पेक्षा जास्‍त महिलांचा सहभाग होता. या रॅलीने घुग्‍गुस शहर दुमदुमले व शहरात चैतन्‍यमय वातावरण निर्माण झाले. त्‍यानंतर देवराव भोंगळे यांच्‍या नविन कार्यालयाचे उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले की या कार्यालयाच्‍या माध्‍यमातुन मा. दिनदयालजी उपाध्‍याय यांच्‍या एकात्‍म मानववाद या आदर्शाला धरून समाजाच्‍या शेवटच्‍या व्‍यक्‍तीपर्यंत पोहचण्‍याचा प्रयत्‍न व्‍हावा. समाजातील अविकसित, गरीब, शोषीत, पिडीत समाजाला जगण्‍यासाठी ज्‍या किमान गोष्‍टी लागतात त्‍या मिळवून देण्‍यासाठी या कार्यालयाच्‍या माध्‍यमातुन प्रयत्‍न व्‍हावे असेही आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले.

कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी वैशाली ढवस, सुचिता लुटे, पुजा दुर्गम, नज्‍मा कुरैशी, सरिता इसारप, शारदा गोडसेलवार, सारिका भोंगळे, सिमा पारखी, सुनिता पाटील, पुष्‍पा रामटेके, कुसुम सातपुते, चंद्रकला मन्‍ने, साजन गोहणे यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवाकेंद्रातर्फे मोफत जलसेवेची सुध्‍दा सुरूवात करण्‍यात आली. कार्यक्रमाला ५ हजारच्‍या जवळपास महिला उपस्थित होत्‍या.

Updated : 3 April 2022 5:06 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.