जि. प.अध्यक्षाच्या गृह मतदारसंघात आश्वासनाची खिरापत

जिल्हा परिषद व पंचायत समिती चा कार्यकाळ संपत आलेला असताना,मागील निवडणुकीत आश्वासनाची खिरापत वाटून निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या मतदार संघातील कामे करण्यात स्पेशल फेल ठरल्या आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असल्याने मतदार संघातील विकासकामे होतील अशी अपेक्षा असणाऱ्या मतदाराच्या हिरमोड झाला आहे. मागील २ वर्षापासून मतदार संघातील जनतेला कधीही न दिसणाऱ्या परंतु निवडणुकीच्या तोंडावर अँक्शन मोडवर येत मतदाराच्या भेटीगाठी येत असल्याने तसेच कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याने मतदार संघात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याअगोदर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्यासह इतरही विरोधी पक्षाच्या इच्छुकांनी संपर्क वाढविला आहे.
जिल्हा परिषदेच्या लोही या मतदार संघात विकास नावालाच शिल्लक आहे.विकासाच्या नावाखाली राजकारण करून राजकीय पोळी शेकण्याचा प्रकार याठिकाणी होताना दिसतो.आगामी निवडनुक डोळ्यासमोर ठेऊन मतदारसंघात भुमीपुजनाचा सपाटा दिसुन येत आहे मतदार संघातील एकमेव उद्योग बोदेगाव येथील साखर कारखाना बंद अवस्थेत आहे.सिंचणाकरिता अडाण प्रकल्पात भरपूर पाणीसाठा उपलब्ध असतानाही काही गावे ओलितपासून वंचित आहेत.रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.पांदन रस्ते मतदारसंघात कुठेही करण्यात आलेले नाही.मतदार संघातील मुख्य रोड सोडले तर इतर रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.जिल्हा परिषदेच्या योजना सर्वसामान्य गोर गरीब कुटुंबापर्यंत पोहोचल्या नाहीत. यासह इतर स्थानिक प्रश्न सुटलेले नाही.यामुळे लोही जिल्हा परिषद मतदारसंघातील विकास खुंटला असल्याची ओरड सुरू असल्याचे दिसते. या संधीचा फायदा घेत विरोधी पक्षाच्या इच्छुकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटीगाठी वाढविल्या आहे.
मागील निवडणुकीत आश्वासनाची खिरापत देत निवडून आलेल्या व जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष पदापर्यंत मजल मारणाऱ्या विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा निवडणूक जवळ आल्याने मतदाराच्या गाठीभेटी घेत आहेत.परंतु मागील निवडणुकीत जनतेने विजयश्री मीळवुन दिली तशी विकासकामात मात्र जनतेच्या नजरेत अपयशी ठरल्याने .येत्या २ते ३ महिन्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला जाण्याची शक्यता आहे. अनेक इच्छुक मतदारसंघात कशा प्रकारचे अपूर्ण विकासकामे झाल्याचे सांगत आहेत.
रस्ते,पाणी,बंद उद्योग,प्रकल्प नावालाच…
या मतदार संघातील बोदेगाव येथील बंद अवस्थेतील करखाना, अडाण सारखा मुबलक पाणीसाठा असलेला प्रकल्प असताना शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळत नाही.पांदन रस्त्याचे काम याठिकाणी करण्यात आलेले नाही.विकासाच्या नावाखाली प्रकल्प नावालाच शिल्लक राहिले आहे.हे प्रकल्प,उद्योग चालु करण्याकरिता कुठलेही प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.