जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय सुरू करा… महानगर भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय सुरू करा…

महानगर भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

आरती आगलावे

चंद्रपुर तालुका प्रतिनिधि

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सरसकट बंदचा निर्णय मागे घेऊन कोरोना निर्बंधासहीत शाळा महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी महानगर भाजपा तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून गुरुवार(20 जानेवारी)ला करण्यात आली.

यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,महासचिव सुभाष कासंगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे,रवींद्र गुरनुले,शिक्षक आघाडीचे मोहमद गिलानी,सयफुल्ल पठाण,सोहेल शेख,अरुण रहांगडाले, रंजिव श्रीरामवार,पुंजाराम लोडे, अनिल खुजे यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले,महाविकास आघाडी सरकारने सरसकट शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा घेतलेला तुघलकी निर्णय अत्यंत चुकीचा व तितकाच दुर्दैवी होता. या निर्णयामुळे विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर दुरगामी परिणाम होत आहे. ऑनलाईन शिक्षण हे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी व दुर्गम/ अतिदुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यापर्यंत पोहचत नाही. दोन वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी वादन सर्वसामान्य जनतेची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकले जात आहेत. यामुळे मुलांचे शिक्षणाचे गांभीर्य नष्ट होत असून त्याचे नुकसान होत आहे.

राज्यभरात सुमारे एक लाख कोचिंग क्लासेस आहेत यामधुन दहा लाखांपेक्षा जास्त खाजगी शिकवणी

घेणारे शिक्षक व प्राध्यापक शिकवतात. यावर अवलंबून असणारे कुटुंब व इतर पन्नास लाख लोकांचा

उदरनिर्वाह अवलंबून आहे. शिवाय विनाअनुदानित व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक यांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, त्याचेवर उपासमारीची नव्हे तर अक्षरशः आत्महत्येची वेळ आली आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी अठरा वर्षे वयावरील आहेत, त्यांनी लसीचे दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत तर पंधरा वर्षावरील लसीकरण सुद्धा वेगाने होत आहेत.

केवळ कोरोनाची भिती दाखवून राज्यभरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा निर्णय अत्यंत दुर्दैवी होता. या निर्णयामुळे विद्याथ्याचे अतोनात नुकसान होत आहे. शाळा बंदच्या या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

राज्यभरात सर्वच व्यवसाय कोरोना निबंधासहीत सुरु आहेत. तेव्हा सरकारने कोरोनाचे नियम लावून शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरु करण्याची परवानगी द्यावी.निव्वळ घोषणा करू नये.

सरकारने दिनांक 24 जानेवारी पासून शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याची घोषणा केली पण जिल्हा प्रशासनाला आदेश दिला नाही.तो निर्गमित करून शाळा महाविद्यालय सुरू करावे अन्यथा भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर महानगर तर्फे जिल्हायात प्रत्येक ठिकानी तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा डॉ गुलवाडे यांनी दिला आहे.

Updated : 23 Jan 2022 3:23 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.