जिल्हा न्यायालय येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

जिल्हा न्यायालय येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

जिल्हा न्यायालय येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

फुलचंद भगत

वाशिम:-जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा न्यायालय वाशिम येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीज्ञ संघ वाशीम यांच्या संयुक्त वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन आज ७ एप्रिल रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा श्रीमती शैलजा सावंत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विजय काळबांडे व वाशीम येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ सिद्धार्थ देवळे,जिल्हा विधीज्ञ संघाच्या अध्यक्षा एड. श्रीमती छाया मवाळ तसेच न्यायिक अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीमती सावंत यांनी पर्यावरणाचे रक्षण केले तर आपल्याला आरोग्य सांभाळता येईल असे सांगितले.

डॉ देवळे यांनी मधुमेह आणि रक्तदाब यांची कारणे व उपचार याबाबत मार्गदर्शन केले. जीवनशैली योग्यरित्या अवलंबली तर मधुमेह आणि उच्च रक्तदाब यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येते असे सांगितले.

डॉ.काळबांडे यांनी शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली.तसेच उन्हाळ्यामध्ये उष्माघात झाल्यास त्यावर कशाप्रकारे उपचार करायचा याबाबत देखील मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.एस. पी.शिंदे यांनी केले.संचालन न्या श्रीमती एस. व्ही. फुलबांधे यांनी केले. आभार एड. एन टी जुमडे यांनी मानले.कार्यक्रमाला ज्येष्ठ विधिज्ञ, न्यायालयातील कर्मचारी आणि पक्षकार देखील उपस्थित होते.

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमानंतर जिल्हा न्यायालयामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रक्तदाब, मधुमेह तसेच मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे कोविड लसीची मात्रा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. या शिबिराचा लाभ १०० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला. आरोग्य शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ हरण आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Updated : 7 April 2022 5:54 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.