जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत आज मार्गदर्शन कार्यशाळा

जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत आज मार्गदर्शन कार्यशाळा
फुलचंद भगत
वाशिम: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमीत्ताचे औचित्य साधून सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिम कार्यालयाच्यावतीने इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्हॅलीडीटी प्रमाणपत्र येत्या 14 एप्रिल रोजी त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर पाठविण्यात येणार आहे.त्याअनुषंगाने आज 8 एप्रील रोजी दुपारी 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यशाळेत जात पडताळणीची कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व इयत्ता 11 वी,12 वी, तंत्रनिकेतन व डि.फार्म या महाविद्यालयांच्या प्राचार्य व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी प्राचार्य व संबंधीत कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन कार्यशाळेला उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिमचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मारोती वाठ यांनी केले आहे.