चौकाचौकात कार्यक्रम : जागतीक आरोग्य दिनानिमित्त उपक्रम

चौकाचौकात कार्यक्रम : जागतीक आरोग्य दिनानिमित्त उपक्रम

चौकाचौकात कार्यक्रम : जागतीक आरोग्य दिनानिमित्त उपक्रम

एनसीसी सैनिकांनी पथनाट्यातुन दिला तंबाखू मुक्तीचा संदेश

फुलचंद भगत

वाशिम – जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्य ११ महाराष्ट्र बटालियन अकोलाचे कमांडिंग ऑफिसर चंद्रा प्रकाश बदोला यांच्या मार्गदर्शनात एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी सैनिकांनी ७ एप्रिल रोजी तंबाखुमुक्त शाळा अभियानांतर्गत शहरातील विविध चौकात तंबाखुबंदीवर पथनाट्य सादर करुन नागरीकांमध्ये जनजागृती केली. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे मानसोपचारतज्ञ राम सरकटे उपस्थित होते.

तसेच आयोजित पोस्टर स्पर्धेतुन तंबाखु व व्यसनाचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, प्रदुषित परिसर, अस्वच्छ वातावरण प्रकाश टाकण्यात आला. कर्करोगाला कारणीभूत तंबाखू हा एक प्रमुख घटक आहे आणि त्याचा प्रतिबंध करता येऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०१९-२० मध्ये ७० टक्क्याहून जास्त मृत्यू हे असंसर्गजन्य आजारामुळे झाले आहेत. क्षयरोग, अपघात, खून, आत्महत्या, एड्स आणि मलेरीया या सर्वांमुळे एकत्रितपणे होणार्‍या मृत्यूपेक्षा तंबाखूच्या वापरामुळे होणारे मृत्यू जास्त आहेत. ‘तंबाखु की नशा अनमोल जीवन की दुर्दशा’, गाडी के धुये सबसे अधिक खतरनाक बीडी, सिगारेट का धुवॉ होता है’, ‘तंबाखू एक बुरी आदत है इसे बदल डालो’, ‘तंबाखु मतलब खल्लास’ असे विविध संदेश या पथनाट्याव्दारे देण्यात आले.

या उपक्रमात दिव्या पाईकराव, दिव्या लहानकर, तृप्ती वानखेडे, वेदांती वाघ, शरयु आळणे, रूचिता वानखेडे, प्रियंका कवळकर, ऋतुजा वानखेडे, रोशनी खंडारे, योगिनी धनगर, पुजा महाले, सुहानी तायडे, दिशा व्यवहारे, समृद्धी वानखेडे, जया राऊत, श्रद्धा भुसारी, क्षितिज उल्हामाले, यश हेन्द्रे, समर्थ हेन्द्रे, कृष्णा कदम, शशांक बल्लाळ, कृष्णकांत चिपडे आदी एनसीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुअ दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले.

Updated : 7 April 2022 6:01 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.