चहाडे येथे कुणबी कबड्डी लीगचे उद्घाटन..

चहाडे येथे कुणबी कबड्डी लीगचे उद्घाटन..

वैभव पाटील :प्रतिनिधी

तांदुळवाडी गट लिंग आयोजित कुणबी कबड्डी लीगचे उद्घाटन 5 मार्च रोजी स्वर्गीय शिवराम यादव पाटील क्रीडानगरी चहाडे नाका येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या भव्य दिव्य स्पर्धांचे आयोजन तांदुळवाडी गटाने करून , अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नियोजन या कबड्डी स्पर्धांचे केले आहे .कुणबी समाज म्हणजे कबड्डी आणि कबड्डी म्हणजे कुणबी समाज हे जणू समीकरणच ग्रामीण भागामध्ये आज सुद्धा दिसून आले.यावेळी कबड्डी लीग चे अध्यक्ष महेंद्र ठाकूर ,पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ शिवा सांबरे ,पालघर पंचायत समितीचे उपसभापती चेतन पाटील, जिल्हा परिषद सदस्य विनया विकास पाटील, नीता समीर पाटील ,माजी जिल्हा परिषद सदस्य अनुश्री पाटील,पालघर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गजानन पाटील , हेमंत हरिचंद्र पाटील, संतोष आत्माराम गवळी ,विशाल धनंजय पाटील, हेमंत हरिचंद्र पाटील, दिनेश मधुकर पाटील, कमळाकर् गोविंद पाटील, राजकुमार पाटील, युवाशक्ती प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रशांत सातवी, सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष दिपेश पावडे, कुणबी क्रिकेट लीगचे संस्थापक भावेश पावडे ,युवक मंडळाचे माजी अध्यक्ष प्रमोद पाटील, सुनील शेलार, युवक मंडळाचे माजी विश्वस्त अनंत पाटील, रोटरी क्लब पालघरचे भगवान पाटील, सूर्यवंशी क्षत्रिय हित्वर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक ठाकूर सामाजिक कार्यकर्ते विकास हरिश्चंद्र पाटील,ज्येष्ठ कबड्डी पट्टू विश्वनाथ पाटील,ज्येष्ठ पत्रकार जनतेचे वाली विजय घरत, तांदुळवाडी गटातील संपूर्ण कबड्डी लीग कार्यकारणी व मान्यवर मंडळी , ग्रामस्थ,क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

प्रथम पारितोषिक 1,00,000 लाख रुपये ,द्वितीय पारितोषिक 71,OOO हजार,तृतीय पारितोषिक 25,OOO हजार, चतुर्थ पारितोषिक 25,OOO हजार ,स्व. महेंद्र अधिकारी व स्व .उमाकांत सोगले यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी आकर्षक चषक देणार येणार आहे .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतीन कदम व प्रतिभा कदम यांनी केले.

Updated : 6 March 2022 10:38 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.