चहाडे गावचे माजी सरपंच यांचे दुःखद निधन

वैभव पाटील: पालघर प्रतिनिधी
सदानंद मदन पाटील यांचे 25 जानेवारी रोजी पहाटेअल्पशा आजाराने वयाच्या ६९ व्या वर्षी दुःखद निधन झाले. ते पालघर तालुक्यातील
चहाडे गावचे माजी सरपंच, सू. क्ष. ज्ञाती मंडळाचे धुकटन गटाचे माजी गटाध्यक्ष,ज्ञाती मंडळाचे माजी उपाध्यक्ष ,पदवीधर, शेतीला पूरक व्यवसाय बागायत , भाजीपाला लागवड, दुग्ध व्यवसाय, गावातील प्रगतीशील शेतकरी होते. अत्यंत समाजप्रिय आणि प्रभावी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व,सरपंच असताना आदिवासी नाका नाव बदलून चहाडे नाका तसेच चोरपाडा नाव बदलून सज्जनपाडा करणेसाठी शासन दरबारी पत्रव्यवहार ,पाठपुरावा केला. गावाच्या विकासासाठी त्यांच्या वडिलांचे संस्कार असल्याने नेहमीच लोकांना मदत करणे, मदतीसाठी धावून जाणे , करारी व वरकरणी रागीट स्वभाव दिसत असला तरी ते खुप मनाने प्रेमळ होते. त्याच्या पार्थिवावर आज 25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता चहाडे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ ,मुलगा, दोन विवाहित मुली, नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.