चवथ्या वर्धापन दिनानिमित्त भगवती हॉस्पीटलच्या वतीने रुग्णांसाठी विविध आरोग्यविषयक प्रेरणादायी उपक्रम

चवथ्या वर्धापन दिनानिमित्त भगवती हॉस्पीटलच्या वतीने रुग्णांसाठी विविध आरोग्यविषयक प्रेरणादायी उपक्रम

चवथ्या वर्धापन दिनानिमित्त भगवती हॉस्पीटलच्या वतीने रुग्णांसाठी विविध आरोग्यविषयक प्रेरणादायी उपक्रम

फुलचंद भगत

वाशिम – जिल्ह्याच्या आरोग्यक्षेत्रात उत्तम आरोग्य सेवेव्दारे अल्पावधीतच नावारुपाला आलेले वाशिम येथील डॉ. जिवन नायक यांच्या भगवती हॉस्पीटलने चार वर्षाचा आरोग्यसेवेचा टप्पा ओलांडला आहे.

उत्तम आरोग्यसेवा, आश्वस्त वातावरण, प्रेमळ विचारपूस आणि रुग्ण व डॉक्टरांचे पवित्र नाते जपणार्या येथील भगवती हॉस्पीटलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. जीवन नायक व डॉ. सौ. सुहासिनी जीवन नायक यांनी आपले सामाजीक उपक्रमात सलग चवथ्या वर्षीही सातत्य कायम राखले आहे.

जिल्ह्यातील निराशेच्या गर्तेत सापडलेल्या अनेक रुग्णांना नवा आशेचा किरण ठरलेल्या शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील भगवती हॉस्पीटल ८ एप्रिल रोजी चवथ्या वर्षपुर्तीकडे वाटचाल केली असून भगवती हॉस्पीटल हे उत्तम आरोग्य सेवेमुळे अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरले आहे. आपल्या चवथ्या वर्धापन दिनानिमित्त बोलतांना डॉ. जीवन नायक म्हणाले की, रुग्णांचे दु:ख निवारण्याचे आम्ही माध्यम बनलो त्याचा आम्हाला आज खरोखर आनंद होत आहे. हे हॉस्पीटल उभारतांना जे स्वप्न आम्ही आणि आमच्या परिवाराने पाहले होते ते स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचे आम्हाला समाधान लाभले आहे. हॉस्पीटलमध्ये सर्व तंत्रज्ञान आणि सुविधा असून हॉस्पीटलच्या चवथ्या वर्धापन दिनानिमित्त एक सामाजीक उपक्रम म्हणून रुग्णांना कमीत कमी पैशात चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा संकल्प कायमस्वरुपी सुरु ठेवला आहे. तसेच ग्राम केकतउमरा येथील चेतन सेवांकुरच्या १५ अंध मुलांना मोफत सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा पुरविण्याचा मानस यावेळी डॉ. नायक यांनी व्यक्त केला.

चवथ्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. जीवन नायक यांनी भगवती हॉस्पीटलमध्ये सुरू केलेल्या विविध प्रेरणादायी उपक्रमाचे नागरीकांनी कौतुक केले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 9 April 2022 7:17 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.