चक्क नदीपात्रातुन ट्रेझर बोटीसह पोकल्यांड मशीन ने वाळू उपसा..

आर्णी ता.प्र- सध्या आर्णी तालुका हा तस्कराचा केंद्रबिंदू बनला असून कमी वेळात जास्त पैसा कमावण्याचं साधन बनला आहे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील दातोडी या गावा शेजारून पैनगंगा नदी वाहते या नदीपात्रात यवतमाळ जिल्ह्यातील व मराठवाड्याच्या रेती तस्करांनी चांगलाच धुडगूस घातला असून नांदेड जिल्ह्यातील माहूर तहसील अंतर्गत येत असलेल्या सायफळ या रेती घाटाचा लिलाव झाला असून करोडो रुपयात या घाटा चे लिलाव झाले आहे. लिलाव झालेल्या घाटामध्ये प्रशासनाकडून अटी-शर्ती दिल्या जाते मात्र रेती तस्करांकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली करताना या दातोडी -सायफळ घाटात पाहावयास मिळत आहे पैनगंगा नदी पात्रात चार ट्रेझर बोटी सह दोन पोकल्यांड मशीन दिवस-रात्र रेतीचा उपसा करत असल्याचे चित्र पैनगंगा नदी पात्रात पहावयास मिळत आहे. या नदीपात्रात महसूल प्रशासनाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. पैनगंगा नदी ही विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असून एकीकडे नांदेड जिल्हा तर दुसरीकडे यवतमाळ जिल्हा लागून आहे. आणि दोन्ही जिल्हा प्रशासन हे कोसो दूर असल्याने रेती तस्कर या संधीचं सोनं करण्यात मग्न आहे.यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सावळी येथील एका राजकारणी नेत्याचे ट्रॅक्टर या घाटातून दिवस-रात्र रेती उपसा करीत असल्याचे काही गावातील लोकांकडून ऐकावयास मिळाले आणि मराठवाड्यातील गोकुळ गोंडेगाव येथील अतुल- उमेश या दोन तस्करांनी या रेती घाटात आपल्या नावाचा जणूकाही शिकाच मारला की काय अशा पद्धतीने यंत्रणेद्वारे नदीपात्रातून रेती उपसा करून मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी या रेतीची विल्हेवाट लावण्यात येत आहे व तसेच यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव दिग्रस आदी ठिकाणी टिप्पर च्या साह्याने रेती तस्करी केली जात आहे या गंभीर बाबीकडे मराठवाड्याच्या जिल्हा प्रशासनाने व यवतमाळ जिल्हा प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन अवैधरित्या तस्करीला आळा घालावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.