घराजवळील नाला बांधकामाचे वारंवार निवेदन देउन बाधकाम न करता नाला खाणारावर कार्यवाहीसाठी आमरण उपोषणाचा दिला इशारा
विदर्भ संपादक हाफिज खान
कारंजा प्रतिनिधी दि २३ कारंजा शहराचे धार्मीक व शैक्षणीहूक दृट्या महाराष्ट्रात नाव आहे कारंजा शहरात
आपल्या मुला मुलीचे शिक्षणासाठी घरे घेउन राहणार्या ची गर्दी वाढली याचाच फायदा घेत काही प्राॅपटी डिलर दलालाचे माध्यमातुन अधिकार्यासी हात मिळवणी करुन संबधीताची फसवणुक करतात.त्याचेंवर कार्यवाही करिता दिला आमरण उपोषणाचा इशारा
सविस्तर असे की, गजानन कदम सर यांनी कारंजा येथील देवांगण काॅलनीत घर घेतले तेथे मागील १६ ते १७ वर्षापासुन आपल्या कुटुंबासह राहतात त्या घराजवळ कच्चा नाला आहे त्या नाल्यामधुन द्वारका काॅलनी व बाजुच्या इतर काॅलनीचे सांड पाणी व पावसाचे पाणी वाहते पाउस आला की हा नाला उग्र नदीचे रुप धारण करते आणी पावसाचे पाणी घरात जाते त्यामुळे घरातील वस्तुचे नुकसान होते व नंतर सांड पाणी जमा राहते त्या जमा पाण्यामुळे रोगराइ पसरते माझ्या दोन्ही मुलाना डेंगु सारखा महाभयंकर आजार झाला होता इतर सुद्धा काॅलनीत रोगराइ पसरते त्यापासुन संरक्षण व्हावे त्याकरिता कारंजा नगर परिषदला नाला बाधकाम व्हावे यासाठी वारंवार अर्ज दिले परंतु न. प. चे संबधीत अधिकारी यांनी लक्ष दिले नाही त्यांचे लक्ष वेधन्याकरिता कदम यांनी या आधी दोन वेळा आमरण उपोषणाचा इशारा दिला परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही खोटे आश्वासन देउन उपोषण मागे घेण्यास लावले नाला बाधकाम तर केलाच नाही या उलट नाला बांधकामाची जाहिरात देउन टेंडर काढले. व ते टेंडर ठेकेदार विजय नागदेव यांनी भरले कामाचा आदेशहि मिळाला परंतु नाला बांधकाम झाले नाही. व बिले काढले.नगर परिषद मधे विचारणा केली असता नाला बांधकाम होउन त्याचे बिल सुद्धा काढण्यात आले अशी तोंडी माहीतीवरुन सभ्रम निर्माण झाला. माञ वस्तुस्थिती या ठिकाणी कुठलेही बांधकाम किंव्हा दुरुस्ती सुद्धा झाली नाही. व माहीती अधिकारात माहीती मागीतली असता समाधानकारक माहीती न दिल्याने राज्य माहीती आयोग अमरावती यांचे कडे अपील केली आहे या सर्व बाबी वरुन लक्षात येते की नाला बांधकामात झाला नाही व खोटे बिले काढण्यात आली. त्या अपहार कर्त्या ठेकेदार व संबधीत अधिकारी यांची योग्य ति चौकशी करुन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकुन संबधीत अधिकारी कर्मचारी यांचेवर कार्यवाही व्हावी त्याकरिता गजानन कदम हे दिनांक २५ जानेवारी पासुन जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे संबधीतावर कार्यवाहि होइपर्यंत आमरण उपोषणास बसत आहेत अशी माहीती गजानन कदम यांनी पञकार परिषदमधे दिलि