गोठ्याला आग दोन बैल गंभिर जखमी शेतकऱ्यावर संकट

गोठ्याला आग दोन बैल गंभिर जखमी शेतकऱ्यावर संकट

मारोती बारसागडे

मो नं ८३९००७८३६७

चामोर्शी तालुका प्रतिनिधी

चामोर्शी: तालुक्यातील फराडा येथिल गोठ्याला आग लागून दोन बैल गंभिर जखमी झाल्याची घटना 22 जाने रोजी रात्री च्या सुमारास घडली यात शेतकरी येमाजी घेर यांचे मोठे नुसकान झाले आहे. शेतकरी येमाजी घेर यांनी नेहमी प्रमाणे सायंकाळी गोठ्यात बैल बाधले होते दरम्यान रात्री गोठयाला आग लागली त्यात दोन बैल गंभिर जखमी झाले जखमी बैलावर उपचार सुरू आहे घटनास्थळी पो.पा.शारदा राऊत भेट देऊन माहीती जाणुन घेतली .मात्र घटनास्थळाचा पंचनामा झाल नाही.हे विषेश या घटणेत शेतकऱ्याचे अतोनात नुसकान झाले आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून मदत देण्यांत यावी अशी मागणी शेतकरी येमाजी घेर यांनी केली आहे. घटणेची माहीती मिळताच माजी पंस सदस्य तथा मरा ग्रामसंवाद संघटणेचे उपाध्यक्ष प्रमोद भगत यांनी फराडा येथील शेतकरी येमाजी घेर यांची भेट घेतली. यावेळी मोहुलीॅचे पो.पा दिगांबर चौधरी गिरिधर चुधरी सुरज म्हाशाखेत्री व गावकरी उपस्थित होते..शेतकऱ्याचे सांत्वन करत नुसकान भरपाई मिळावी अशी मागणी केली या घटणेची माहीती तहसिलदार संजय नागटिळक यांना देण्यात आलीआहे.

Updated : 25 Jan 2022 4:04 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.