गोंडवाना गणतंत्र पार्टी ची आढावा बैठक बिरसा भवन वाघापूर येथे संपन्न

गोंडवाना गणतंत्र पार्टी ची आढावा बैठक बिरसा भवन वाघापूर येथे संपन्न
————————————————————————-
गोंडवाना गणतंत्र पार्टी ची जिल्हा परिषद/पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आढावा बैठकीला राज्याचे प्रमुख मा हरीषची ऊइके मा बळवंतराव मडावी कार्याध्यक्ष मा.बाळकृष्ण गेडाम प्रदेश महासचिव मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच सौ.विजयाताई रोहणकर जिल्हा अध्यक्ष (महिला) शोभाताई वरखेडे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप शेडमाके जिल्हा अध्यक्ष यवतमाळ यांनी केले गोंडवाना गणतंत्र पार्टी मध्ये नवीन तालुक्यातील कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती महिला पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या राळेगाव, बाभुळगाव, कळंब,नेर, घाटंजी, वणी,मारेगाव आर्णी तालुक्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्व सहभागी मान्यवरांचे मार्गदर्शन झाले कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद/पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा असे आव्हान गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या आढावा बैठकीत देण्यात आले होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन दिलीप शेडमाके यांनी केले होते.