गेल्या 24 तासात 282 पॉझिटिव्ह ; 170 कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात 282 पॉझिटिव्ह ; 170 कोरोनामुक्त

ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1656

यवतमाळ दि. 23 जानेवारी (जिमाका) : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 282 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 170 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1614 व बाहेर जिल्ह्यात 42 अशी एकूण 1656 झाली असून त्यातील 66 रूग्ण रूग्णालयात तर 1590 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1079 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 282 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 797 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 75540 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 72095 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1789 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 282 रूग्णांमध्ये 99 महिला व 183 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात तीन, बाभुळगाव 17, दारव्हा 27, दिग्रस 10, घाटंजी आठ, मारेगाव एक, नेर तीन, पांढरकवडा 44, पुसद 13, राळेगाव 16, उमरखेड तीन, वणी 16, यवतमाळ 105, झरी जामणी दोन व इतर जिल्ह्यातील 14 रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ 10 हजार 938 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 34 हजार 971 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.32 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 26.14 आहे तर मृत्यूदर 2.37 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1695 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 74 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1695 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 70 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 717 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 4 बेड उपयोगात असून 751 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Updated : 23 Jan 2022 1:08 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.