गळती थांबेना ! आणखी एका अभिनेत्याचा भाजपला रामराम

गळती थांबेना ! आणखी एका अभिनेत्याचा भाजपला रामराम

कोलकता  – पश्‍चिम बंगालमधील अभिनेते बोनी सेनगुप्ता यांनी सोमवारी भाजपला रामराम ठोकला. त्यामुळे बंगालमध्ये भाजपला लागलेले गळतीसत्र चालूच आहे.

मागील वर्षीच्या बंगाल विधानसभा निवडणुकीआधी सेनगुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या निवडणुकीतील पराभवामुळे बंगालची सत्ता मिळवण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. त्यानंतर अनेक नेते, अभिनेते, अभिनेत्री त्या पक्षातून बाहेर पडत आहेत. त्या यादीत सेनगुप्ता यांच्या रूपाने आणखी एका अभिनेत्याची भर पडली.

निवडणूक निकालापासून सेनगुप्ता भाजपपासून अंतर राखून होते. अखेर अपेक्षेप्रमाणे त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पश्‍चिम बंगाल आणि बंगाली चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी भाजपने अनेक आश्‍वासने दिली. मात्र, त्या आश्‍वासनांचे पालन करण्यात त्या पक्षाला सपशेल अपयश आले. निवडणूक निकालानंतर भाजप नेते माझ्या संपर्कात नव्हते, असे त्यांनी म्हटले.

विधानसभा निवडणुकीआधी बंगाल भाजपमध्ये मोठी भरती झाली. इतर पक्षांच्या नेत्यांबरोबरच अनेक अभिनेते, अभिनेत्री त्या पक्षात डेरेदाखल झाले. मात्र, आता त्या राज्यात भाजपला ओहोटी लागल्याचे चित्र आहे.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.