गडचिरोली पोलीस दल आयोजित पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पहिले 'भव्य गडचिरोली महोत्सव' उत्साहात पार पडले.

गडचिरोली पोलीस दल आयोजित पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पहिले 'भव्य गडचिरोली महोत्सव' उत्साहात पार पडले.

विजेत्या संघाचा मान्यवरांकडुन सत्कार.

व्हॉलीबाल स्पर्धेत सिरोंचा तर रेला स्पर्धेत झिंगानुरच्या संघाने

पटकाविले प्रथम क्रमांकाचे बक्षीस

बचत गट व स्वयंसहायत गटांना मिळाली भव्य बाजारपेठ, विविध स्टॉलमधुन 14 लाखांच्यावर वस्तुंची विक्री

प्रा.श्रीमंत सुरपाम जिला प्रतिनिधी म मराठी गडचिरोली 9420190877

गडचिरोली दि 04 मार्च: जिला पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन गडचिरोली जिल्हयात पहील्यांदाच ‘भव्य गडचिरोली महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले. हा महोत्सव जिल्हा परिषद कार्यालयाच्या भव्य मैदानावर दिनांक 01/03/2022 ते 02/03/2022 दरम्यान पार पडला. या महोत्सवाचा समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक 02/03/2022 रोजी पार पडला.

गडचिरोली पोलीस दलाने आयोजित केलेल्या व दोन दिवसापासुन चाललेल्या या गडचिरोली महोत्सवाचे विशेष आकर्षण बिरसा मंुडा व्हॉलीबॉल स्पर्धा व आदिवासी रेला समुह नृत्य स्पर्धा तसेच हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या पहील्या दिवशी दिनांक- 01/03/2022 रोजी महोत्सवाचे उद्घाटन मा. ना. एकनाथजी शिंदे, नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांचे हस्ते, मा. पोलीस उपमहानिरीक्षक श्री. संदिप पाटील सा., गडचिरोली परिक्षेत्र नागपूर यांचे उपस्थितीत पार पडले, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्हयाच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील व्हॉलीबालचे 10 संघ उपस्थित होते. या संघांमध्ये अत्यंत रोमहर्षक सामने पहावयास मिळाले. या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ुन 03 विजेत्या संघांची निवड करण्यात आली. प्रथम क्रमांक विजेते असरअल्ली व्हॉलीबॉल सिरोंचा या संघास 25,000/-रु. रोख, ट्राफी व गोल्ड मेडल, व्दितिय क्रमांकाचे विजेते आरडी क्लब अहेरी यांना 20,000/-रु. रोख, ट्राफी, सिल्व्हर मेडल, व तृतिय क्रमांकाचे विजेते जय बजरंग क्लब एटापल्ली यांना 15,000/- रु. रोख, ट्राफी व ब्रााँझ मेडल देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणुन कामगिरी करणाया तरुण राघवसु गावडे, उत्कृष्ट स्मॅशर म्हणुन अंजी कनयक्का पेद्दी व उत्कृष्ट लिफटर म्हणुन निसार शेख यांना चषक, ट्रॅकस्ुट व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच महोत्सवाच्या दुसया दिवशी दिनांक 02/03/2022 रोजी आदिवासी रेला समुह नृत्य स्पर्धा पार पडल्या. त्यातुन आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन उपस्थितांना पहावयास मिळाले. या रेला नृत्य स्पर्धेत जिल्हयातुन 10 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी उत्कृष्ट पहील्या तीन विजेत्यांची निवड करण्यात आली प्रथम विजेत्या जय सेवा रेला संघ झिगानुर यास 25,000/रु. रोख, ट्राफी व प्रमाणपत्र, व्दितिय क्रमांकाच्या अनुप डॉन्स रेला संघ घोट यास 20,000/रु. रोख, ट्राफी व प्रमाणपत्र, आदिवासी रेला नृत्य संघ धानोरा यास 15,000/रु. रोख, ट्राफी व प्रमाणपत्र व इतर सहभागी संघांना उत्तेजनार्थ प्रत्येकी 5000/- रोख देवुन गौरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्राच्या अतिदुर्गम भागातुन आलेल्या आदिवासी पारंपारिक रेला नृत्यासोबतच राजमुद्रा ग्रुपच्या कलावंतानी विविध नृत्य सादर करुन प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.

महोत्सवातील दोन्ही दिवस गडचिरोली जिल्हयातील विविध 50 बचत गट व संस्थांनी आपल्या उत्पादनाचे व विविध वस्तुंचे स्टॉल लावलेले होते. यामध्ये नवजीवन उत्पादक संघ, नवेगाव गडचिरोली, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, एम्स अकॅडमी बुक स्टॉल गडचिरोली सोबतच मौजा किटाळी, वासाळा, पुराडा, कोटमी, भामरागड, अहेरी येथुन बांबु, माती व लाकडापासुन निर्मीत हस्तकलेच्या वस्तु, ऑर्गनिक उत्पादने तांदुळ, हळद, पालेभाज्या, अंबाडी सरबत, मोहफुलापासुन तयार केलेले लाडु बिस्किट, जॉम, मस्य लोणचे, जांभुळ निर्मीत विविध उत्पादने तसेच इतर वस्तु विक्रीकरीता लावण्यात आले होते. बचत गट व स्वयंसहायता गटांच्या विविध हस्तकलेच्या वस्तुंच्या स्टॉलमधुन 14 लाखाच्यावर उपस्थित नागरीकांनी खरेदी केली. या महोत्सवाच्या माध्यमातुन बचत गट व संस्थांना मोठी बाजारपेठ मिळाली.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली श्री. कुमार आशिर्वाद, मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., मा.अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. अनुज तारे सा., पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाचे अधिष्ठाता मा. श्री. कडु सा., उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. गणापुरे, कृषी विज्ञान केंद्र (आत्मा) गडचिरोली मा. श्री. संदिप कहाडे यांचे हस्ते पार पडले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री. महादेव शेलार व अंमलदार यांनी अथक परीश्रम घेतले.

Updated : 4 March 2022 2:29 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.