खेडे गावांच्या विकास कामांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का?

नांदेड/माहुर/किनवट
गावात एखादा डांबरी व शक्यतो मुरुमीकरणाचा रस्ता करणे. सभामंडप उभारणे. त्यावर आपल्या नावाचा भलामोठा फलक लावून उद्घाटनाचा नारळ फोडणे अशीच काहीशी आज आमदार, खासदार निधीची र्मयादित संकल्पना बनली आहे. लोकोपयोगी कामांपेक्षा कंत्राटदार व ठेकेदार कार्यकर्त्यांना पोसणारा निधी अशीही या निधीची एक ओळख बनू पाहत आहे. त्यामुळे आमदार, खासदार निधी कशासाठी व कोणासाठी? या निधीच्या खर्चाला निश्चित धोरण का नाही?कुठल्याही सरकारी कामाच्या उद्घाटनाचा नारळ फुटला की आपला गाव अन् गल्ली आनंदून जाते. आपल्या गावाला नवीन काहीतरी मिळणार, आपली समस्या दूर होणार हा तो आनंद असतो. सध्या आमदार, खासदार निधीतील कामांचे असे शेकडो नारळ गावोगावी फुटतात अन् त्यांचे फलकही झळकतात. पण खरचं या निधीतून गावांच्या पदरात भरीव काही पडते? या निधीचा हिशोब गावकऱ्यांना ठाऊक असतो? लोकप्रतिनिधींसाठी अशा काही विशेष निधीची मुळात गरज आहे?
राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी लोकप्रतिनिधींकडून मुलभूत सुविधांसाठी निधीची मागणी होत आहे.
असाच माहूर तालुक्यातली ऐक खेडागाव -:
माहूर तालुक्यात असलेल्या सायफळ या गावात कोणतीही विकास कामे दिसून येत नाही. सायफळ गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की जेव्हापासून आमदार इलेक्शन झाला तेव्हापासून आमदार भीमराव त्यांनी सायफळ गावातील नागरिकांना चेहराही दाखवलेला नाही अशी चर्चा सायफळ गावातील नागरिकांकडून होत आहे. इलेक्शन आले की लोक प्रतिनिधी बाहेर पडतात. मला वोट,द्या मला मत द्या म्हणून पाया पडतात. आणि निवडून आल्यानंतर पाच वर्षां हि चेहरा दाखवत नाही विकास कामे तर दूरच राहिली.सायफळ या गावात मागील कितीक वर्षापासून नाली बांधकाम झालेला नाही. अशा अनेक मोठ्या समस्या आहे. सायफळ हे गाव नाही तर असे माहूर तालुक्यातील कितीच गाव आहे की त्या गावांमध्ये रस्ते च्या, पाण्याच्या, नाल्याच्या, घरकुलाच्या,लाइनीच्या,अश्या मोठ्या समस्या आहे. या समस्याकडे माहूर/. किनवट तालुक्याचे आमदार भीमराव केराम लक्ष देणार का?
माहूर तालुक्यात असलेल्या सायफळ या गावात कोणतीही विकास कामे दिसून येत नाही. सायफळ गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की जेव्हापासून आमदार इलेक्शन झाला तेव्हापासून आमदार भीमराव त्यांनी सायफळ गावातील नागरिकांना चेहराही दाखवलेला नाही अशी चर्चा सायफळ गावातील नागरिकांकडून होत आहे. इलेक्शन आले की लोक प्रतिनिधी बाहेर पडतात. मला वोट,द्या मला मत द्या म्हणून पाया पडतात. आणि निवडून आल्यानंतर पाच वर्षां हि चेहरा दाखवत नाही विकास कामे तर दूरच राहिली.सायफळ या गावात मागील कितीक वर्षापासून नाली बांधकाम झालेला नाही. अशा अनेक मोठ्या समस्या आहे. सायफळ हे गाव नाही तर असे माहूर तालुक्यातील कितीच गाव आहे की त्या गावांमध्ये रस्ते च्या, पाण्याच्या, नाल्याच्या, घरकुलाच्या,लाइनीच्या,अश्या मोठ्या समस्या आहे. या समस्याकडे माहूर/किनवट तालुक्याचे आमदार भीमराव केराम यांचे दुर्लक्ष का ?सायफळ गावातील रस्त्याची अवस्था बिकट आहे. तर पिण्याचे पाणी 200 रुपये महिन्याने विकत घ्यावे लागते,आता उन्हाळा सुरू झाला आहे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याबाबत समस्या वाढत आहे. गावामधले सरपंच स्थापित नाही गावातील ग्रामपंचायत व प्रशासक लागू जवळपास तीन ते साडेतीन वर्ष होत आले आहे.तरी माहुर किनवट तालुक्याचे आमदार फक्त किनवट तालुक्या पुरते राहिले आहे का ? इलेक्शनच्या वेळेस आमदारांनी दिलेले आश्वासन कुठे गेली. गावामध्ये सौर ऊर्जा पॅनल चे लाईट नाही, गाव मध्ये पाणी फिल्टर ची सुविधा नाही, गावांमध्ये कोणतेही अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही, गावामध्ये कचऱ्याचे ढीग लागले आहे गाव मध्ये स्वच्छता नाही, गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पाचवा वर्ग पर्यंत शिक्षण दिले जाते पण पाच वर्गांमध्ये फक्त दोन शिक्षक उपस्थित आहे, माहूर तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या सायफळ हा खेडागाव माहूर तालुक्यातील विकास कामांमध्ये सर्वात मागे आहे. अशा सर्व गंभीर समस्ये कडे आमदारांचे संबंधित अधिकाऱ्यांचे तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का?