खंडाळा येथील सरपंच यांनी केला पदाचा दुरुपयोग

जाकीर हुसेन (संपादक) – 9421302699
कुठलाही ठराव न घेता केला आर्थिक घोटाळा
आर्णी:तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार राहुल जाधव यांनी केली असुन दोषींवर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
खंडाळा ग्रामपंचायत मध्ये रु. ६४,००० / – अंगणवाडी व नळ दुरुस्ती हयाचे बिल केवळ सरपंच मालाबाई जाधव यांनी सहया मारुन काढलेले आहे . सदर सही ही सरपंच महिलेची नसून तिचे मुलाची आहे सदर प्रकार हा कागदोपत्री बनावटी सही मारणे असा असून त्याचा घटनाक्रम मौजे खंडाळा ग्राम पंचायत मध्ये जुन – जुलै २०२१ मध्ये आहे . तेंव्हा सरपंच माला जाधव यांचा मुलगा दिनेश अशोक जाधव हा सुध्दा कागदपत्रे बनावटी करण्यामध्ये आहे . हा फारमोठा आर्थिक घोटाळा गंभीर स्वरुपाचा व दखलपात्र तसेच समाजविघातक गुन्हा आहे .
बळीराजा चेतना अभियानांतर्गत ऑगष्ट २०२१ मध्ये एकटया महिलेच्या सहीने सही बनावट मुलाने मारुन काढण्यांत आलेले आहे . हा फार मोठा आर्थिक घोटाळा असून आर्थिक अफरातफरीचा भाग आहे व बनावटी करणाचा भाग आहे .
हायमोस्ट करंट लाईट हे वास्तविक जागेवर मौजे खंडाळा ग्राम पंचायत अंतर्गत लावले असून त्याचे बिल हे सोलर लाईट म्हणून फसवणूक करुन काढलेले आहे . सदर रक्कम ही १,४४,७४६ / – एवढी आहे . सदरचा प्रकार २०२१ मध्ये सप्टेंबर – ऑक्टोंबर महिण्यांत घडलेला आहे .
खोटे कागदपत्रे तयार करणे खरे असल्याचे भासविणे त्याव्दारे शासनाचे योजनेचे पैसे तावटने आर्थिक अफरातफर करणे रेकॉर्ड बनावट सहीचे तयार करणे ,या संपुर्ण प्रकरनाची सखोल चौकशी करण्याची मागणी राहुल जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.