क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून वाद, विरोधानंतरही अस्लम शेख यांच्या हस्ते उद्घाटन

क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून वाद, विरोधानंतरही अस्लम शेख यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई – मुंबईतील मालाड येथील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून वाद पेटला आहे. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्याआधी परिसरात भाजप, बजरंग दलाने टिपू सुलतान मैदानाच्या नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

अनेक दिवसांपासून मालाडमधील हे मैदान दुरवस्थेत होते. 2 कोटी 55 लाख रुपये खर्चून या मैदानात नव्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. नूतनीकरण केलेल्या या मैदानाला टिपू सुलतान हे नाव देण्याचा निर्णय मंत्री अस्लम शेख यांनी घेतला होता. त्यानंतर भाजपने यावर आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, आज टिपू सुलतान नामकरणावरुन विरोध करणा-या भाजपने यापूर्वी भाजप नगरसेवकांच्याच वॉर्डमधील दोन रस्त्यांना टिपु सुलतान यांचे नाव दिले आहे. भाजपाचे आमदार अमित साटम यांनी एम पूर्व वॉर्ड येथील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग असे नाव देण्याबाबत 2013 मध्ये अनुमोदन दिले होते. तर 2001 मध्ये अंधेरी पश्चिम मधील भवन्स कॉलेजमधील रस्त्याला शेर ए टिपू सुलतान मार्ग नाव देण्याकरता त्यावेळचे भाजप नगरसेवक विठ्ठल खरटमोल हे सुचक होते.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.