केळापूर तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उत्साहात उदघाटन

पांढरकवडा सागर मुडे प्रतिनिधी
:- केळापूर तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयाचे गणराज्य दिनाच्या पर्वावर पांढरकवडा नगरीच्या नगराध्यक्षा सौ वैशाली नहाते यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय महसूल अधिकारी विवेक जॉन्सन आणि प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय तोडासे होते.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या अनेक समस्या आहे त्यातील अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे,अनेक ठिकाणी पत्रकारांचे साधे कार्यालय सुद्धा नसल्याने स्थानिक पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश पडोळे यांनी सर्व सदस्यांना सोबत घेत कार्यालय निर्मिती साठी अथक प्रयत्न केल्याने कार्यालयाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनी नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी तालुक्यातील सर्वच कार्यालयाचे अधिकारी, सर्वच पक्षाचे नेते आणि ग्रामीण भागातील पत्रकार बांधव उपस्थित होते.
या प्रसंगी वैशाली नहाते यांनी पत्रकार बांधव सामान्य जनतेच्या समस्या प्रशासन दरबारात मांडत असल्याने त्यांना हे कार्यालय हक्काचे ठिकाण होणार असल्याचे स्पष्ट केले तर विवेक जॉन्सन यांनी प्रशासन आणि पत्रकार यांच्यात समनव्यय राहिल्यास जनतेच्या समस्या लवकर सुटण्यास मदत होणार असल्याचे सांगितले .
या वेळी कार्यक्रमाचे संचलन सुबोध काळपांडे तर आभार प्रदर्शन संजय औदार्य यांनी केले.यावेळी केळापुर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष योगेश पडोळे, उपाध्यक्ष अरूण गोडे, सचिव राहुल वऱ्हाडे, सहसचिव राजेश बेतवार, कोषाध्यक्ष सुबोध काळपांडे, सह कोषाध्यक्ष रूपेश बाजोरीया, सल्लागार दामोधर बाजोरीया, दिपक तावरे, अशोक बेले, संभा मडावी, सदस्य ओमेश दर्शनवार, संजय औदार्य, रवि दर्शनवार, सतिश पुल्लजवार, रफिक खान, संदिप बाजोरीया, सुधिर कोचे सागर मुडे विलास होलगीलवार राजू आगरकर सुनील वनकर हे उपस्थित होते.