कॅनडाच्या सीमेवर गारठून मरण पावलेले नागरिक होते गुजराथी

कॅनडाच्या सीमेवर गारठून मरण पावलेले नागरिक होते गुजराथी

वडोदरा – कॅनडातून अमेरिकेमद्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात कडाक्‍याच्या थंडीमध्ये गारठून मरण पावलेले चार भारतीय हे मूळचे गुजरातमधील होते, असे आता उघड झाले आहे.

गांधीनगर जिल्ह्यातील कालोल तालुक्‍यात या चौघांचे मूळ वास्तव्य होते. त्यांच्या गावातील अन्य ग्रामस्थांबरोबर हे चौघेजण कॅनडाला रवाना झाले होते. अमेरिकेमध्ये अवैधरित्या प्रवेश करत असताना यांच्यापैकी 7 ग्रामस्थांना अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. मात्र अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही, म्हणून या सर्वांची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

चार नागरिकांच्या गारठून मरण पावण्याच्या घटनेवर गांधीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुलदीप आर्य यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “ही एक दुर्दैवी घटना होती. याबद्दल आम्हाला प्रसार माध्यमांमधूनच समजले. आतापर्यंत आम्हाला अधिकृतपणे कोणीही काहीही सांगितलेले नाही. जर परराष्ट्र मंत्रालयाकडून काही समजले तर आम्ही मदतीसाठी काही प्रयत्न करू शकू.’ असे त्यांनी म्हटले आहे.

हे चौघे ज्या गावातील असल्याचे मानले जात आहे, तेथील आणखीन 3-4 कुटुंबे अजूनही बेपत्ता आहेत. त्यांच्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला कळवले आहे. कॅनडात राहणाऱ्या या गावातील नागतिरकांकडे ग्रामस्थांनी माहिती मागितली आहे. मात्र कॅनडाच्या प्रशासनाकडून ओळख पटवण्यासाठी रुग्णालयात प्रवेश दिला जात नसल्याचे या गावातील ग्रामस्थांनी सांगितले.

हे चौघेही गुजराथी बोलत होते, असे मिनेसोटा कोर्टात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी तक्रारीमध्ये अमेरिकेच्या गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या पैकी कोणीही अस्‌खलीत इंग्रजी बोलू शकत नव्हते. अमेरिके आणि कॅनडामध्ये गुजराथी नागरिकांची संख्या खूप जास्त असल्याचेही आपल्याला माहिती असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

सीमेवरून अवैधपणे मानवी वाहतूक होण्याच्या या प्रकाराची अमेरिका आणि कॅनडाच्या अधिकारयांकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे मरण पावलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो.


Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.