कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अळिंबी उत्पादन तंत्रज्ञान उपक्रमाला प्रतिसाद

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अळिंबी उत्पादन तंत्रज्ञान उपक्रमाला प्रतिसाद

(लातूर) उदगीर येथिल कृषि महाविद्यालयात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवावर आधारित (Experiential Learning Modules) कार्यक्रमा अंतर्गत अळिंबी उत्पादन तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाच्या माध्यमातून व व्यवसायिक दृष्टीने ठेऊन अळिंबी चे उत्पादन यशस्वीरीत्या घेतले.

या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी अळिंबी उत्पादनाचा तांत्रिक अभ्यास करून, शेतीला पूरक व्यवसाय कसा ठरेल या व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रायोगिक तत्त्वावर अळिंबी चे उत्पादन घेतले. उत्पादित अळिंबी चे विक्री शहरातील हॉटेल व्यवसायिक, व्यापारी, गृहिणी, गावातील शेतकरी महिला, महीला बचत गटांना थेट विक्री करून नफा मिळवला.

ह्या उपक्रमाच्या माध्यमातून परीसरातील शेतकर्यानामध्ये अळिंबी उत्पादना विषय, आहरातील पौष्टिक महत्व या विषय जनजागृती करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये उद्योगीक आत्मविश्वास वाढला आहे, हा अनुभवावर आधारित उपक्रम यशस्वी होण्यासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य ङाॅ. ए.एम पाटील, उपप्राचार्य ङाॅ.एल.व्ही. पिंपळपल्ले, विभाग प्रमुख ङाॅ. ए.जी. दापकेकर, कार्यक्रम प्रमुख ङाॅ. ङि.जी. पानपट्टे, प्रा. पि .एस. राठोङ, सह्योगी विषय विशेषज्ञ , ङाॅ. टि.बी. मुंडे, सह्योगी विषय विशेषज्ञ ङाॅ. एस. एन. वानोळे,सह्योगी विषय विशेषज्ञ प्रा.व्ही. एल. सोमवंशी यांनी सखोल मार्गदर्शन केले.

Updated : 8 April 2022 8:54 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.