कू.प्रतिक्षा संजय वाघमारे हि राज्यातुन सातव्या तर उमरी तालुक्यातुन सर्वप्रथम..

प्रतिनिधी गाडेकर गजानन
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बोथी तालुका उमरी जिल्हा नांदेड या शाळेतून ईयत्ता पाचवी वर्गातुन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PUP) ईयत्ता पाचवी 2021 या परीक्षेत कू.प्रतिक्षा संजय वाघमारे हि राज्यातुन सातव्या तर उमरी तालुक्यातुन सर्वप्रथम श्रेणीत पास झाली त्या निमित्ताने काल. दि.08.03.2022 रोजी मानवहित लोकशाही पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष मा.मालोजीराजे वाघमारे,भोकर तालुका प्रतिनिधी मा.गजानन गाडेकर,भोकर तालुका अध्यक्षा पार्वतीबाई बरकंबे, युवा तालुका अध्यक्ष भोकर मा.शंकर दिवटेकर ,मा.के.वाय.देवकांबळे भोकर यांनी कू.प्रतिक्षा संजय वाघमारे आणि आई वडील यांचा बोथी येथे येऊन शाल,पुष्पहार देऊन स्वागत केले व कू.प्रतिक्षा संजय वाघमारे हिला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या..