किरीट सोमय्या यांच्या विरोधात देश द्रोहाचा गुन्हा दाखल करा;शिवसेनेचे तहसील चौक येथे आंदोलन

आयएनएस विक्रांत या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्यांनी घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे किरीट सोमय्या यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता आज दिनांक ७ एप्रिल रोजी पुसद तालुका शिवसेना व शहर शिवसेना तर्फे तहसील चौक येथे आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आले. यानंतर याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. सन २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्याने मोहीम सुरू केली होती. ‘केंद्र आणि राज्य सरकारांनी असमर्थता दर्शवल्यानं किरीट सोमय्या पुढे आला आणि प्रचंड निधी गोळा केला. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर विमानतळावर डबे घेऊन उभा राहिला आयएनएस विक्रांत हा देशाच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय असल्यानं लोकांनी सढळ हस्ते दान केलं, नेव्ही नगरमध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अनेक अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये दिले. या रकमेचं किरीट सोमय्याने काय केलं ते देशाला समजायला हवं, ही रक्कम तो भंगारात जाऊ पाहणाऱ्या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनविण्याकरिता राजभवन येथे जमा करणार होता, मात्र सोमय्याने गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याच आरटीआयमधून समोर आलं आहे. लोकांच्या देशप्रेमाशी खेळून किरीट सोमय्याने गद्दारी केलं आहे. त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यांत यावा. अन्यथा पुसद तालुका व शहर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर विधानसभा सहसंपर्कप्रमुख उमाकांत पापिंनवार, तालुका प्रमुख दीपक काळे, शहर प्रमुख संतोष दरणे, रवी पांडे, दीपक ऊखळकर, शिवसेना उपतालुका प्रमुख सोपीनाथ माने, संजय बयास, विशाल पेन्शनवार, वैभव सुणे, गणेश खटकाळे, अर्जुन राठोड, रवी बहादुरे, दिनेश गवळी, विलास कोरडे, विशाल जाधव, अजय चिदरवार, गणेश खटकाळे, संजय पोटे, वैभव हरणे, संदीप लाभसेटवार, विजय बाबर, रवि बहादुरे, योगेश नेहळे, कमर ताज, अमर सोनटक्के, नरेंद्र पाठक आदी शिवसैनिक यांच्या सह्या आहेत.