किरीट सोमय्या म्हणजे भाजपची ‘आयटम गर्ल’; नवाब मलिकांची बोचरी टीका

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची ‘आयटम गर्ल’; नवाब मलिकांची बोचरी टीका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यावर बोचरी टीका केली आहे. किरिट सोमय्या यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासल्याचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी ही टीका केली आहे. किरीट सोमय्या म्हणजे हे एखाद्या चित्रपटातील ‘आयटम गर्ल ‘असल्याची बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. मलिक यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी किरिट सोमय्या यांच्यावर टीका केली. नवाब मलिक यांनी म्हटले की, एखाद्या चित्रपट चांगला चालावा यासाठी चित्रपटात आयटम गर्लची आवश्यकता असते. किरिट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील भाजपच्या आयटम गर्लप्रमाणे आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी राजकारणातील ‘आयटम गर्ल’चा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका मलिक यांनी केली.

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी सातत्याने महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे. कागदपत्रांच्या आधारे त्यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस नेत्यांविरोधात आरोपांची मालिकाच सुरू केली होती. या पक्षांच्या काही नेत्यांविरोधात ईडीने कारवाईदेखील सुरू केली आहे.

तर, दुसरीकडे भाजपकडून होणाऱ्या आरोपांना राष्ट्रवादीकडूनही जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादीकडूनही मलिक यांनी भाजप नेत्यांवर अनेक आरोप केले होते. अंमली पदार्थ सेवन प्रकरणात मलिक यांनी भाजप नेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.