किराणा दुकानात, सुपर मार्केटमध्ये “वाईन’ मिळणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

किराणा दुकानात, सुपर मार्केटमध्ये “वाईन’ मिळणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई – राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. या संदर्भात आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल. सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.

राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीने राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकले आहे. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
सध्या राज्यात वाईनची दरवर्षी 70 लाख लिटरची विक्री होते. या नव्या धोरणामुळे हा आकडा 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्या आधी राज्य सरकारने वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केला आहे.

दुसरीकडे, अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे. उत्पादन शुल्काने या आधीच आयात व्हिस्कीवरील शुल्क 300 टक्‍क्‍यांवरून 150 टक्‍क्‍यांवर आणले आहे. आता सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

“महाराष्ट्रात बऱ्याच वाईनरी असताना आता 1000 चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वाईनरी चालते. त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे.”
– नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री

महाराष्ट्र को मद्यराष्ट्र बनाएंगे
“मस्त पियो, खूब जियो’ हा या सरकारचा मंत्र आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे. करोनामध्ये सर्वसामान्यांना औषधीची आवश्‍यकता आहे. पण “दवा नहीं, हम दारू देंगे’, “महाराष्ट्र को मद्यराष्ट्र बनाएंगे’ हा या सरकारचा निर्णय आहे. करोनामध्ये कष्टकऱ्यांसाठी निर्णय घ्यायला यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेळ नाही. राजकारण करणे आणि दारूवाल्यांना प्रोत्साहन देणे ही यांची भूमिका आहे, असे म्हणत या निर्णयावरून सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.