काँग्रेस ने पाठीत खंजीर खुपसला तर भाजप ने पोटात – पराग गुंडेवार

चंद्रपूर – विदर्भाची मागणी ही फार जुनी असून,तेलंगाणाची मागणी नवी असताना सुधा काँग्रेस ने तेलंगाणा राज्याची निर्मिती केली मात्र ६२ वर्षा पासून महाराष्ट्राच्या गुलामगिरीत विदर्भ अडकला आहे, विदर्भा चे सिंचन प्रकल्प,उद्योग रखडलेले आहे, विदर्भाचा स्वतंत्र इतिहास दडपला गेला आहे, प्रत्येक राज्याला त्यांचा स्वतंत्र इतिहास आहे, विदर्भ ही गोंड राजें ची भुमी असून विदर्भात गोंड राजेंनी परकीयांचे हल्ले परताऊन लाऊन अधीराज्य केले, चांदागड हे पुर्वीचे गोंडराज्याचे राज्य होते ते आता सध्याचे चंद्रपूर आहे येथे अनेक तलाव, धरण ही खांडक्या बल्लाळशाह राजे आत्राम यांचे पुत्र विरशाह राजे आत्राम गादीवर आल्यावर करण्यात आली, राजे विरशाह आत्राम यांनी शेती व नव्या जमीन पद्धतीला उजाड दिला,सैन्यांना पगारा सह जमिनी दील्या जायच्या,शेती विशयक त्यांनी अनेक उपाय योजना केल्या, ईतर राज्यच्या तुलनेत चांदगड सह विदर्भावर अनेक परकीय हल्ले झाले,मात्र न जूमानता न हार मानता शत्रुंना सडेतोड उत्तर देऊन राज्य अभादीथ राखल,
मात्र काही राजकीय नेत्यांच्या आग्राह व हट्टा पाई कटकारस्थाना पाई विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात १९६० साली शामील करण्यात आले,
आणी तेव्हा पासून विदर्भावर प्रतेक बाबतीत अन्यायाची मालीक सुरू झाली व आजही सुरुच आहे..
वर्हाड म्हनजे सोन्याची कर्हाड म्हनुण ओळखल्या जानार्रा विदर्भतील शेतकरी माय बाप एके काळी ईंग्रजांना कर्जद्याचा मात्र संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाला सामील केल्या नंतर सर्वात जास्ती आत्महत्या ह्या विदर्भात झाल्या आहे,तेलंगाना राज्य निर्मीती ची मागनी नवीन असतांना काॅंग्रेस सरकार ने तेलंगाना राज्य निर्मीती केली,विदर्भातील जिवती तालुक्यातील १४ गावे तेलंगानाला दीली, मात्र विदर्भाची जुनी मागनी असुन सुद्धा राजकीय फायद्या साठी पच्छीम महाराष्ट्रातील नेत्यांचा कटकारस्थाना पाईच विदर्भ वेगळा झाला नाही,
भारतीय जनता पार्टीने तर २०१४ च्या निवडणूकी पुर्वि वेगळ्या विदर्भाचा मुद्या रेटूनच धरला भाजप ने विदर्भात जनतेची जनमत चाचनी घेतली सर्वाधीक कौल हा स्वतंत्र विदर्भ राज्या साठीचा होता तरीही मात्र विदर्भ स्वतंत्र राज्य झाले नाही,भाजप ने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यावर निवडणुक लठवीली आणी निवडुन आल्यावर विदर्भातील जनतेला केराची टोपली दीली केंद्रात आणी विदर्भात सत्ता असतांना सुद्धा भाजपने विदर्भ राज्याची मागनी व त्यांनी विदर्भातील जनतेला दिलेला शब्द पाळला नाही,भाजपने विदर्भातील जनतेच्या भावना दूखावल्या दु:खावर मिठ चोळल सरळ भाषेत बोलाच तर भाजप ने विदर्भातील जनतेसोबत गद्दारी केली आहे,विदर्भातील जनतेच्या काॅंग्रेस ने पाठीत तर भाजपने पोटात खंजीर घुपसला आहे.
मात्र आता विदर्भातील जनतेने गप्प बसू नये आपल्यावर होणार्या अन्याया विरूद्ध आता आवाज उचलने गरजेचे आहे,
महाराष्ट्र सरकार विदर्भातील सर्व उद्योग,शिक्षन,योजना पच्छीम महाराष्ट्रात पळवीत आहेत, विदर्भाची लोकसंख्या दिवसन दिवस कमी होत चाली आहे याला कारण महाराष्ट्र सरकरा आहे, वादर्भातील तरून पलायन करीत आहे, विदर्भात उद्योग नाहीत ,विज निर्मीती आपन विदर्भात करतो आणी त्याचा लखलखात मुंबई सह पच्छीम महाराष्ट्रात होतो,
विजनीर्मीती मुळे होणार्या प्रदुर्षनाचा त्रास विदर्भातील जनता सहन करते,मात्र विदर्भातच निर्मान होणारी विज आम्हाला २०० युनीट मोफत मिळत नाही,दिल्लीत २०० युनीट फ्री तर पंजाब मध्ये ३०० युनीट फ्री विज तेथील जनतेला मिळत आहे,आणी इकळे आम्हीच विज तयार करून सुद्धा आम्हाला कोरोना काळातील विजबील माफी करीता आंदोलन करावी लागते रसत्यावर उतरावे लागते आणी आमचेच लोकप्रतीनीधी मंत्री पच्छीम महाराष्ट्रातील नेत्यांच्या दबावा खाली येऊन जाब विचाराला आलेल्या विदर्भवाद्यांनवर खोटे खटले दाखल करतात कीती ही शोकांतीका?
महाराष्ट्रात सामील होऊन काय निशीब विदर्भाच्या वाट्याला कीती हे दू:ख विदर्भाने विदर्भातील जनतेने सहण करायचे,३३००० पेशा जास्ती शेतकर्यांने विदर्भात आत्महत्या केल्या आहेत मात्र महाराष्ट्र सरकरा मुंग गीळुण गप्प बसली आहे, आता विदर्भातील जनतेने उठायला हव तरुनांनी एकवटायला हव आता नाही तर मग कधीच नाही, कारण शेतकरी आत्महत्या,वाठते नक्षलवाद,२०० युनीट विज मोफत,शेती पंपाचे विज मोफत,साप चावून मरणार्यांना मोबदला,विदर्भातील उद्योजकांना स्वस्त दरात विज,उच्च शिक्षण व्येवस्था,रुग्नालय,ग्रमीन भागात विकास कामे विकास कामे म्हनजे नुस्ते गाव शहर डेकोरेशन करणे नाही तर गावाचे काया पालट करून प्रतेक सुख सुवीधा गावात उपलब्द करून देणे होय अश्या अनेक समस्या मार्गी लागतील मात्र त्या करीता विदर्भ स्वतंत्र राज्य होणे गरजेचे आहे विदर्भ स्वतंत्र राज्य झाले तर एमपीएससी बंद होऊन विपिएससी सुरू होनार असर्थातच विदर्भातील तरुणांना विदर्भातच नौकर्या मीळतील परीवाराला सोळुण शिक्षणा करीत कींवा रोजगाराच्या शोधात पलायण करण्याची गरज भासनार नही,ज्यांनी विदर्भातुन पलायन केले असे सगळे विदर्भवादी विदर्भात परतील पुन्हा एकदा विदर्भ सर्व द्रुष्टीकोनातुण परीपुर्ण राज्य होऊ शकतो,
विदर्भच्या भल्यासाठी या महाराष्ट्र सरकार च्या तीजोरीत पैसा नाही व यांची मनस्थीती ही नाही, विदर्भ म्हणजे यांना शोषन करण्या साठि सुपीक भुमी वाटते,
विदर्भात ४.५ हजार मॅगावाॅट विज निर्मीती होते मात्र विदर्भाला १२०० ते १५०० मॅगावाॅट ची गरज आहे, महाराष्ट्रात राहुन आम्हाला ती देखील मिळत नाही,
विदर्भाचे स्वतंत्र राज्य झाल्यास उरलेली विज उच्च दरात विकता येऊ शक्ते ८ ते १२०० कोटींची मिळकत होऊ शक्ते अशे अनेक फायदे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मीती चे आहे, आणी त्या साठीच येणार्या पीठीच्या भवीष्या साठी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मीतीची नितांत गरज आहे, त्या साठिच म्हणतो विदर्भातील सर्व जनतेनी,तरूनांनी प्रतेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता,नेते,लोकप्रतीनीधी,पदाधीकार्यांनी पक्षपात बाजुला सारून राजकारण बाजुला सारून वेगळ्या विदर्भाच्या लढ्यात सहभागी झाले पाहीजे विदर्भाच्या सर्वांनगीण विकासा साठी,तरुनांच्या भविष्यासाठी वेगळ्या विदर्भरज्याच्या मागनी साठी एकत्र येऊन केंद्रा कळुण विदर्भराज्य घेणे आज काळाची गरज आहे.संवीधानात लिहले आहे की एखाद्या राज्याची निर्मीती करणे कींवा एका राज्याला दूसर्या राज्यात विलीन करणे याचे सर्वस्वी अधीकार राष्ट्रपतींना आहे,
जर विदर्भातील जनतेचे कौल स्वतंत्र विदर्भ राज्या साठी आहे विदर्भातील जनतेला विदर्भ वेगळा हवा आहे,तर मग राष्ट्रपतींना सर्वस्वी अधीकार संवीधानाने दिले आहे राज्य निर्मीतीचे मग चला तर आज पासुनच विळा उचला आणी आता विदर्भ स्वतंत्र राज्य झाल्या शिवाय शांत बसु नका.
जय विदर्भ🙏🏻
आपलाच
पराग सुरेश गुंडेवार
मुख्य संपादक / संपादक
विदर्भ माझा न्युज 24
तालुका अध्यक्ष – विराआंस,युवा आघाडी,बल्लारशाह
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख – माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती,चंद्रपुर (चांदागड)