करोडपती विलास महाजन यांच्या मजुर असन्यावर आक्षेप सहकार विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

करोडपती विलास महाजन यांच्या मजुर असन्यावर आक्षेप सहकार विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

करोडपती विलास महाजन यांच्या मजुर असन्यावर आक्षेप सहकार विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

यवतमाळ महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मजुर असन्यावर सहकार विभागाची झालेली कार्यवाही संपूर्ण राज्यभर गाजत असतांना याच कडीतील राज्य सहकार बोर्डाचे संचालक व यवतमाळ जिल्हा मजुर संघाचे अध्यक्ष विलास सुधाकर महाजन यांच्यावरही याच न्यायाने कारवाई करण्याची मागणी यवतमाळ जिल्ह्यातील मुळ मजुर असलेल्या सभासदांनी केल्याने खळबळ उडाली आहे. विलास महाजन हे राज्यातील महिलांव्दारा संचाली त एकमेव बँक असलेल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या सिईओंचे पतीराज आहेत, ज्यावर नुकतीच रिझर्व बँकेने कार्यवाही केल्याने बँकेचे सर्व व्यवहार बंद झाले आहे. याविरोधात यवतमाळ जिल्ह्यात गेले काही महिणे बँक ठेविदारांचे सतत आंदोलन झलीत. या बँक डुबीत प्रकरणी जिल्ह्यातील विस हजार कुटूंबांना झळा पोचल्या आहेत.

सहकार कायद्यान्वये नोंदणी केलेल्या मजुर कामगार सहकारी संस्थांना शासनाचे नियमांव्दारे अनेक विभागाची कुशल-अकुशल कामे मिळतात. या संस्थामध्ये मजुरांव्यतीरीक्त अनेक धनदांडगे घुसल्याने मुळ मजुरांचा जीवनस्तर उंचावन्याचा शासनाचा उद्देश विफल होत आहे. राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण देरेकर सारखे आमदार लोकही जेव्हा मजुर प्रवर्गातुन निवडून येउन मुंबै बँकेची विस-विस वर्षे सत्ता भोगतात, यासारखा भोंगळ कारभार एक ना एक दिवस उघड होणारच होता. हे प्रकरण सद्या राज्यभर गाजत असतांना दरेकरांसोबत राज्य सहकार बोर्डाचे संचालक व यवतमाळ मंजुर कामगार सहकारी संघाचे गेली साडेसाहा वर्षापासून अध्यक्ष असलेले विलास महाजन हे सुध्दा मजुर प्रवर्गात मोडत नसल्याचे पुरावे देवून त्यांना पदमुक्त करण्याची मागणी मजुर कामगार संस्थेचे सभासद सुनील पुनवटकर यांनी केली आहे. विभागीय सहनिबंधकांना दिड महिन्यापूर्वी केलेल्या तक्रारीत पुनवटकर यांनी महाजन या “च्यकडे असलेल्या अनेक मालमत्तांचे दस्त पुरावे म्हणून सादर केले. यात यवतमाळ शहरातील अनेक मालमत्तांचा समावेश आहे. शिवाय त्यांच्याकडे स्वताचे नावे असलेले बार अँड रेस्टॉरेंट, उद्योग उभारणीसाठी वैयक्तीकरीत्या शासनाचा एमआयडिसीतील मोठा भुखंड, अनेक गांवांतील शेत्या या सर्वांचे कोट्यावधी रुपये किमतीचे दस्त सादर करुन एखाद्या व्यक्तीकडे एवढ्या कोट्यावधीची संपत्ती असतांना तो मजुर प्रवर्गात कसा बसू शकतो असा प्रश्न उपस्थित केला आहे. शासनाच्या उद्येशाला सफल बनविन्यासाठी अशा श्रीमंत व्यक्तींना मजुरांच्या सवलती लाटन्यापासून रोखणे आवश्यक असून यासाठी सहकार विभागाने लवकरात लवकर महाजन यांचेवर अपात्रतेची कार्यवाही करावी अशी मागणी सुनील पुनवटकर यांनी आज पत्रकार परिषदेतून केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत अनेक मजुर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Updated : 5 April 2022 6:57 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.