करंजी रोड येथें मोफत ई-श्रम कार्ड शिबिराच आयोजन

करंजी रोड.. (प्रतिनिधी,)असंघटीत कामगार नोंदणी अभियान अंतर्गत करंजी रोड येथे दिनांक २३ जानेवारी २०२२ पासून मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी करण्याचा कार्यक्रम करंजी येथील प्रत्येक वॉर्डात आयोजित करण्यात आला आहे. सदर शिबिराचे आयोजन गावातील प्रत्येकाची ई-श्रम नोंदणी होई पर्यंत राहणार आहे. मोफत शिबिराचे आयोजन मा.निमिष रमेशराव मानकर विद्यमान सदस्य तथा माजी अर्थ, बांधकाम सभापती जिल्हा परिषद यवतमाळ यांनी केलं असून निशुल्क ई-श्रम शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देतांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे. असंघटित कामगार म्हणजे लहान शेतकरी, शेतमजूर, पशुपालन करणारे,विडी कामगार, बांधकाम करणारे,लेदर कामगार, सुतार, न्हावी,वीटभट्टी कामगार, घरगूती कामगार, भाजीपाला व फळविक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, आशा कामगार, आटोरिक्षा चालक,तसेच स्थलांतरित कामगार यासारखे अनेक लोक आहेत ज्याची नोंदणी शासनाकडे नाहीत त्यामुळे आपत्ती वेळी योग्य मदत मिळत नाही म्हणुन शासन या नोंदणीच्या माध्यमातून अश्या नोंदणीकृत लोकांना एक UAN विशिष्ट ओळख नंबर देणार असून ते आधारकार्ड सारखे ई- श्रम कार्ड आहे. त्यामुळे लोकांना एक ओळख मिळणार असून त्याचे अनेक लाभ मिळण्यास मदत होईल. पेन्शन, वैद्यकीय उपचारासाठी मदत,2 लाखापर्यंत मोफत विमा,अपघातानंतर मिळणारी मदत, घर बांधणीसाठी कर्ज सुविधा, तसेच इतर शासकीय योजनेचा लाभ या ई-श्रम कार्ड मूळे मिळण्यास मदत होणार आहे.

यात १८ ते ५९ वयोगटातील सर्वाना नोंदणी करता येईल. नोदणी करतेवेळी आधार कार्ड, बँकपासबुक,सोबत मोबाईल,व घरातील व्यक्तीचे आधारकार्ड गरजेचे आहे. तरी करंजी रोड येथील प्रत्येक कामगार बंधू-भगिनीनी सदर नोंदणी करण्याचे आव्हान, मोफत शिबिराचे आयोजक मा. निमिष रमेशराव मानकर माजी अर्थ, बांधकाम सभापती तथा विद्यमान सदस्य जिल्हा परिषद यवतमाळ यांनी केलं आहे.