कबड्डीच्या प्रेक्षणीय खुले सामन्यांचे उदघाटन

कबड्डीच्या प्रेक्षणीय खुले सामन्यांचे उदघाटन

यवतमाळ- प्रमोदकुमार मांगुळकर मंच भारी स्व. कमलाबाई शंकरराव मांगुळकर यांचे स्मृती प्रित्यर्थ पांडूरंग क्रिडा मंडळच्या वतीने कबड्डीचे प्रेक्षणीय खुले सामन्यांचे आयोजन 2 व 3 एप्रिल 2022 रोजी करण्यात आले होते. या कबड्डी सामन्यांचे उदघाटन 2 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता करण्यात आले. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, कृषी उत्पन्न बाजार समिति सभापती रविभाऊ ढोक, कृउबास संचालक किशोर बडे, मेहबुब कुरेशी, ग्रापं सदस्य ज्योती मरसकोल्हे, उपसरपंच सुनिल कांबळे, प्रविण पुडके आदि उपस्थित होते. दिनेश पाटील यांच्या हस्ते सामन्यांचे उदघाटन करण्यात आले. प्रथम सामना पांडूरंग क्रिडा मंडळ भारी विरूध्द यवतमाळ क्रिडा मंडळ मध्ये झाला. यावेळी परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Updated : 4 April 2022 2:34 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.