कंञदारांच्या दुर्लक्षित पणामुळे -धानोरा -रांगी- वैरागड मार्गाचे काम अपूर्णच रस्त्यावरील गिट्टीने अनेकाचा केला घात.प्रशासनाचे दुर्लक्ष

कंञदारांच्या दुर्लक्षित पणामुळे -धानोरा -रांगी- वैरागड मार्गाचे काम अपूर्णच रस्त्यावरील गिट्टीने अनेकाचा केला घात.प्रशासनाचे दुर्लक्ष

धानोरा तालुका प्रतिनिधी दिवाकर भोयर मो.न.9421660523

धानोरा ते ठाणेगाव मार्गाच्या रस्त्याचे में 2018 मधे खडगिकरण, रूंदीकरण ,मजबुतिकरण,व डांबरीकरण करण्या करिता कंञाटदाराने प्रथम सोडे गावापासून खोदकाम सुरु केले .माञ तब्बल 42 महिने लोटूनही या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने धानोरा व आरमोरी तालुक्यातील अनेक गावातील लोकांच्या मनात राग असला तरी याचा नाहक त्रास मागील 3वर्षापासून या मार्गावरील जनता जनार्दन सोसत असून अधिकारी तुपासि तर जनता माञ उपाशी म्हनायची वेळ आलि आणि पुन्हा या मार्गावर प्रवास करनार्या लोकांना किति दिवस याच स्थिती चा सामना करावा लागेल असा खोचक प्रश्न जनताजनार्ध विचारीत आहेत. कारण ठेकेदाराच्या दुर्लक्षीत पणामुळेच या कामाची दुरदशा झाल्याची प्रतिक्रिया लोक देतायेत. *रांगी ते वानरचुवा मार्गावर गिट्टी*– सहा महिन्यापासून रांगी ते वानरचुवा या तिन किलोमिटर आंतरावर टाकलेल्या गीट्टीचा त्रास नागरिकांना होत आहे.याच गिट्टीमुळे अनेकाचा अपघात झाला.काहीना किरकोळ जखमा झाल्यात तर काहीना जिव गमवावा लागला. कंत्राटदाराने सदर रस्त्याचे काम जेवापासुन सुरु केले तेव्हा पासुन वादग्रस्त ठरलेला आहे.अपुऱ्या बांधकामामुळे मागील मागील 03वर्षा पासुन वाहनधारक ,विद्यार्थी ,प्रवासी कर्मचारी शेतकरी या सगळ्यांना मोठा ञास सोसावा लागतआहे.

काम सुरु झाल्या नंतर पावसाळा सुरु झाला. काही तांत्रिक अडचणी आल्या मग रस्ताच वाहून गेला मार्च पासून करोना(कोविड-19) संसर्गामुळे देश लाँकडावून मधे अडकला.ईथेच अडला धानोरा रांगि ,वैरागड मार्गाचे काम अशाही परिस्थितीत सोडे ते मोहली मार्गावर जून ,जुलै २०२०मधे परत कामाला सुरुवात करण्याकरिता गिट्टी टाकुन पसरविण्यात आले. लोकांना वाटायला लागले कि आता काम पुर्ण होईल पण हीअपेक्षा फोल ठरली.जानेवारी 2022 उजाडले पण काम झालेले नाही. .अशाही कठिण परिस्थितीत मोठी कसरत करत वाहने लोकांनी काढली . त्यानंतर मोहली ते रांगी-विहीरगाव १८कि.मि.मार्गावर जागोजागी खड्डे पडले . गिट्टी बाहेर निघाली असल्याने रस्त्यावरुन वाहन चालने कठिन झाले. कंत्राटदारांच्या दुर्लक्षित पणामुळे मागील 42 महीन्या पासुन या मारगाची रेलचेल काही प्रमाणात थांबलि. हा राज्यमार्ग आहे कि काय अशी शंकाच लोकांच्या मनात निर्माण झालेलि आहे.तरी अधिका-यांनी लक्ष देण्याची गरज आहे. पण याचि दखल ना लोकप्रतिनिधींनी घेतली, ना अधिकारी .याचा शारिरीक ,मानसिक ,आणि आर्थिक ञास परिसरातिल जनता सोसत आहे. त्यामुळे या मार्गावरुन कोनतेही वाहन धावताना दिसत नव्हते .अशाच स्थितीत बस बंध पडल्याने मुलांच्या भवितव्याचि चिंता विद्यार्थ्यांच्या पालकांना तेव्हा पासुनच सतावत आहे. रांगी ते वानरचुवा या रस्याचे काम कधि सुरु होणार हे कुणिच छातिठोक पणे सागतांना दिसत नाहीत.याचा नाहक ञास लोकांना ,विद्यार्थ्यांना ,वाहन धारकांना कर्मचाऱ्यांना ,परिसरातील नागरिकांना सोसावा लागत आहे.

सध्या स्थिती रांगी ते वैरागड काम इतक्या संथगतीने सुरू असल्याने याचा नाहक त्रास जनतेस सोसावा लागत आहे. *विहीरगाव ते कोरेगाव मार्गाची रुंदी कमी* ——————विहीरगाव ते रांगी 9कि.मि.अंतर असुन ३कि.मी.बाकी असला तरी झालेल्या ६किलोमिटर रस्त्याची रुंदी कमि असल्याने दोन चारचाकी वाहन काढने कठिन आहे.डांबरीकरण केल्यानंतर दोन्हि कडा भरलेल्या नाहीत.त्यामुळे मार्गाचे रुंदीकरण आहे कि नाही अशि शंका लोकांच्या मनात निर्माण झालेलाआहे.त्यासोबतच डांबरीकरनाचे दुसरा स्तर केव्हा हा प्रश्न सध्यातरी अधांतरी आहे. *विहीरगाव ते रांगी मोहलि रुदीकरन झालेच नाही*.——————- मोहलि- रांगी- विहीरगाव—— धानोरा तालुक्यातिल मोहलि पासुन रांगी पर्यंन्त 7कि.मि.अंतराचे रुंदीकरण झाले नाही तसेच रांगी पासुन आरमोरी तालुक्यातिल विहिरगाव पर्यन्त रस्त्याचे रुंदीकरनाचे काम झालेले नाहीत त्यामुळे केलेले काम अधुरेच राहनार याचाही ञास वाहनधारकांना सोसावा लागणार. *रस्त्यावरील झाडाची कटाई कधि* -रांगी ते आरमोरी मार्गावरील विहीरगाव कोरेगाव पर्यंत मुख्य रस्त्याच्या काठावर अनेक झाडे आहे.हे झाडे अपघाताला आमंत्रण देनारे आहे.त्यामुळे अपघात झालेत.झाडामुळे व फांद्यामुळे रस्ताबरोबर दिसत नाही आणि पुढिल वाहने सुद्धा दिसत नसल्याने अपघात होन्याचे नाकारता येत नाही.रस्त्याच्या बाधंकामा सोबतच झाडे तोडन्यात यावे अशी मागणी लोकांनी केली आहे. *तिन वर्षापासुनची होरपळ थांबनार तरी कधी*—————————- — डांबरीकरन होणार कधी?मागिल 3वर्षापासुन काम झालेच नाही आणि कधि होणार हे कोणिच सांगु शकत नाही त्यामुळे विकासाची शासनाकडून अपेक्षा ठेवनेच चुकिचे आहे.सरकारला विकास साधायचा आहेका ? जनतेका ञास कायमस्वरुपी लोकांना दायचा असल्याने ठेकेदाराला सरकारचा आशिर्वाद तर नाहीना असे नागरीक प्रश्न विचारत आहेत.कारण काम अपुरे असुनही कोणतिही कार्यवाही होताना दिसत नाही.

Updated : 27 Jan 2022 2:30 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.