ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आत्माराम काळे
पुणे
पुणे – ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने शनिवारी याबाबत माहिती दिली आहे. कोह सामुई, थायलंड येथे हृदयविकाराच्या झटक्याने वॉर्नचा मृत्यू झाला. वैद्यकीय कर्मचार्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही शेन वॉर्नला वाचवण्यात अपयश आले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले होते. शेन वॉर्नने क्रिकेटपटू मार्शच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. पण मग या महान गोलंदाजाचे हे शेवटचे ट्विट असेल हे कोणास वाटले नव्हते.
जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्ननेही अलीकडेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शेन वॉर्नने युक्रेनच्या बाजूने ट्विट करुन रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे वर्णन केले होते. वॉर्नने युक्रेनचे समर्थन केले आणि रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचे म्हटले होते.